नगरपंचायत निवडणुक.... धनंजय मुंडे यांची पंकजा मुंडे यांच्यावर टीका

 नगरपंचायत निवडणुक.... धनंजय मुंडे यांची पंकजा मुंडे यांच्यावर टीकाबीड : नगरपंचायत निवडणुकीच्या  निमित्ताने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे भाऊ-बहिण आमने सामने आले आहेत. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपाला नगरपंचायत निवडणूक लढवायला साधा उमेदवार मिळत नसल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.

पुढे बोलताना मुंडे म्हणाले की, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कोणीच प्रयत्न केला नाही. आजही बीड जिल्ह्याची ओळख ही ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून आहे. 12 डिसेंबर 2014 साली गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोड महामंडळाची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र पाच वर्ष सत्ता असतानाही महामंडळाची निर्मिती करता आली नाही. या काळात महामंडळ दोनदा रद्द झाले. सत्ता गेल्यानंतरच ऊसतोड कामगारांची आठवण होते. जो जिल्हा सातत्याने दुष्काळ अनुभवत होता, त्या जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी झाली. मात्र अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही. त्यांना 502 कोटी रुपयांची मदत मिळून दिल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post