करोनाला रोखण्यासाठी निर्बंध लावणे हा बोगसपणा, भाजप खासदार डॉ सुजय विखे पाटील यांची स्पष्ट भूमिका

 

करोनाला रोखण्यासाठी निर्बंध लावणे हा बोगसपणा, भाजप खासदार डॉ सुजय विखे पाटील यांची स्पष्ट भूमिकानगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या केवळ 26 असली तरी जिल्ह्यातील मोठे राजकीय नेते कोरोना बाधित आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे  खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे कोरोना लॉकडाउन बाबतचे महत्त्वपूर्ण वक्तव्य समोर आले आहे. 


कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने राज्य सरकारकडून कडक निर्बंध लावण्याच्या हलचालींना वेग आला आहे. अशातच डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, सरकारने कोणालाही कोविड काळात दंड करू नये. लग्न समारंभ हे होत राहतील. कितीही गर्दीची मर्यादा आपण ठेवण्याचा प्रयत्न केला तरी लोक येतात. लोकांचं प्रेम तेवढं असतं. पण लोकांनी लग्नाला आल्यावर स्वतःहून कोरोनाचे निर्बंध पाळणे आवश्यक आहे. मास्क घालावे. हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत आहेत.


खासदार डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले की, आपण प्रत्येक वेळी लोकांवर निर्बंध टाकू शकत नाही. मग माणसानं जगायचं कसं? लग्न समारंभावर निर्बंध आणताना आपण हा विचार करत नाही की, या लग्न समारंभामुळे उपजिविका करणारे किती लोक होते. बँडवाले, लाईटवाले, मंडपवाले त्यांनाही मुलंबाळं आहेत. उद्या जर लॉकडाउन लागलं गेलं तर त्यांच्या मुलाबाळांना कोण खाऊ घालणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post