कर्जत नगरपंचायत निवडणुक प्रचारात खा.विखेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

कर्जत नगरपंचायत निवडणुक प्रचारात खा.विखेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोलनगर : कर्जत नगर पंचायतची निवडणूक सुरू आहे. ही निवडणूक भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीतील भाजप  उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील शुक्रवारी कर्जतमध्ये होते. त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. खासदार विखे म्हणाले, ही निवडणूक माजी मंत्री राम शिंदे यांची किंवा माझी नाही. माझी निवडणूक अडीच वर्षांनी आहे. शिंदेंची निवडणूक तीन वर्षांनी येणार आहे. पण या निवडणुकीत मागील तीन-चार दिवसांत जो प्रकार पहायला मिळाला तसा प्रकार आमच्या कुटुंबाने मागील 50 वर्षांत कधी पाहिला नाही. एका पक्षाचे उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यासाठी सत्ता पक्षातील माणसे जावीत अशा पद्धतीचे राजकारण पाहिले नव्हते. सत्ताधारी पक्षाची कामे घेणारा ठेकेदार आमच्या पक्षातील उमेदवाराला उचलून घेऊन जातो. निवडणूक अधिकाऱ्यासमोर भाजप महिला उमेदवार रडत होती. ऐवढे मोठे घडून सुद्धा दडपशाही करण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post