हिवाळी अधिवेशनात करोनाचा शिरकाव, विधानसभा कामकाजात सहभागी आमदार बाधित...


हिवाळी अधिवेशनात करोनाचा शिरकाव, विधानसभा कामकाजात सहभागी आमदार बाधित... मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी मुंबईला आलेले नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघाचे भाजप  आमदार समीर मेघे  यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. समीर मेघे यांनी दोन दिवस अधिवेशनात सहभाग देखील घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे विधिमंडळातील आमदारांचे धाबे दणाणले आहेत.


अधिवेशनासाठी सभागृहात प्रवेश करताना सर्व अधिकारी, कर्मचारी व आमदारांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते आहे. तसेच सर्वांना मास्क देखील अनिवार्य करण्यात आलेला आहे. याच नियमांतर्गत समीर मेघे यांची कोरोना चाचणी केली असता आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मेघे सध्या गृहविलगीकरणात असून घरीच उपचार घेत आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

आता भाजप आमदार समीर मेघेंच्या संपर्कात आलेल्या इतर आमदारांचीही कोरोना चाचणी करावी लागणार आहेत. त्यातून कुणी पॉझिटिव्ह आढळतं का, हे चाचणीचे अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. मात्र इतरही आमदार पॉझिटिव्ह आढळून आले, तर नेमका काय निर्णय या हिवाळी अधिवेशनाबाबत घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post