संत गोदड महाराजांची प्रतिमा थेट सोमय्यांसमोर ठेवून पूजन, ते देवापेक्षा मोठे आहेत का? आ.रोहित पवार बरसले

 किरीट सोमय्या अँटमसॉंग  - आ. रोहीत पवार

    


जामखेड (प्रतिनिधी नासीर पठाण सह अशोक वीर जामखेड)


 - पवारांवर आरोप करून अनेक जण मोठे झाले आहेत अशी कबुली अनेक नेत्यांनी दिली आहे आता सौमय्या तसे आरोप करीत आहेत. जसे एखादा सिनेमा हिट होवो अगर प्लॉप जावो त्यामध्ये अँटमसॉंग असते त्याप्रमाणे सध्या सौमय्या अँटमसॉंगची कामगिरी बजावत आहे असा टोला आ. रोहीत पवार यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांना पत्रकार परिषदेत लगावला.

           भाजपच्या सभेत केलेल्या आरोपाबाबत आ. रोहीत पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. यावेळी बोलताना आ. रोहीत पवार म्हणाले, नगरपंचायत निवडणूकीत भाजप उमेदवारांनी माघारी का घेतली याबाबत न्यायालयात सांगितले आहे. आपले उमेदवार माघार का घेतात याचे त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. निवडणूकी तील पराभव समोर दिसताच ते आता दबावतंत्र व दहशतीचे आरोप करीत आहेत. 


       नगरपरिषदेच्या हद्दीतील सोळाशेच्या आसपास घरकुलधारकांचे सिटी सर्व्हेमध्ये नाव नाहीत सदर घरकुल धारकांनाच तेथेच स्वताच्या नावाचे घरकुल देणार आहे त्यांना बेघर करणार नाही तसेच रस्त्यावर असलेल्या एकही टपरीधारक उठणार नाही याची आपण सातत्याने ग्वाही देऊनही विरोधक मते मिळवण्यासाठी माझा विरोध असल्याचा अपप्रचार करीत आहेत. 

        कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री संत गोदड महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन भाजपच्या सभेत करताना किरीट सोमय्या यांना दोन पावले चालवेना झाले. संयोजकांनी खुर्ची सहीत गोदड महाराज यांची प्रतिमा सौमय्या समोर आणली व प्रतिमा पुजन करून तसेच आडबाजूला ठेवली यामुळे आम्हा सर्व नागरिकांचा अवमान झाला आहे. किरीट सोमय्या देवापेक्षा मोठे झाले आहे का असा सवाल आ. रोहीत पवार यांनी केला आहे.



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post