आ.निलेश लंके यांनी घेतले जवाहरमधील करोनाबाधित विद्यार्थ्यांचे पालकत्व, प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन घेतली भेट

 आ.निलेश लंके यांनी घेतले जवाहरमधील करोनाबाधित विद्यार्थ्यांचे पालकत्व, प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन घेतली भेट



 नगर: पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे असलेल्या केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयात चार दिवसांत 82 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. यात विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. या कोरोना बाधितांवर पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार नीलेश लंके यांनी  सोमवारी  रात्री उशिरा कोरोना बाधितांची भेट घेतली तसेच विद्यालयाची पाहणी केली.

जोपर्यंत विद्यार्थी कोरोनामुक्त होणार नाहीत. तोपर्यंत मी या विद्यार्थ्यांचा पालक आहे असा आधार देत कोरोना बाधित असणाऱ्या विद्यार्थ्यांची आमदार निलेश लंके यांनी रूग्णालयात जाऊन भेट घेत या सर्वांना आधार दिला आहे.


आमदार निलेश लंके यांनी सांगितले की,

आज पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयाल कोरोना बाधित विद्यार्थ्यांची भेट घेतली व मानसिक आधार देत त्यांचे मनोबल वाढवून काळजी न करण्याच आवाहन केलं तसेच नवोदय विद्यालयात पण भेट दिली.पालकांनी व विद्यार्थीनी घाबरून जाऊ नये,काळजी करू नये. उपचारासाठी दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची काळजी घेतली जाईल,सर्वोतम उपचार केले जातील. जोपर्यंत विद्यार्थी कोरोनामुक्त होणार नाहीत, तोपर्यंत मी या विद्यार्थ्यांचा पालक आहे व या सर्व बाधित रुग्णांचा सर्व लागणारा खर्च निलेश लंके प्रतिष्ठान संस्थे मार्फत मोफत केला जाईल.

टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयात काल म्हणजेच २६ डिसेंबर २०२१ रोजी तब्बल ३१ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. तर आज पुन्हा एकदा याच नवोदय विद्यालयातील आणखी २० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.या विद्यालयातील बाधितांचा आकडा आता ७० वर गेला आहे.अजून आकडा वाढण्याची शक्यता असून, प्रशासनाला व आरोग्य विभागाला सतर्क राहण्याची सूचना दिली आहे.



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post