'या' कारणासाठी अजित पवार यांनी थेट राष्ट्रपतींना लिहिले पत्र

 'या' कारणासाठी अजित पवार यांनी थेट राष्ट्रपतींना लिहिले पत्रमुंबई: गेल्या काही वर्षांपासून मराठी भाषेला  अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी केली जात आहे. या मागणीसाठी मराठी भाषा विभागाच्यावतीने आजपासून राष्ट्रपती  यांनी पत्र लिहून विनंती करण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या पत्र मोहिमेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहभाग घेतला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आपल्या स्वाक्षरीचं पत्र पाठवून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची विनंती त्यांनी केली.


ज्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून संबंधित राज्याला भरीव अनुदान मिळते. केंद्र सरकारने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगु, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्रात देखील अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. याच एक भाग म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र मोहिमेद्वारे ही या मागणीकडे लक्ष वेधले जाणार आहे. यामुळेच अजित पवारही या पत्र मोहिमत सहभागी झाले आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post