7 लाखांची लाच... सहाय्यक पोलीस निरीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यात

 

7 लाखांची लाच... सहाय्यक पोलीस निरीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यातयवतमाळ : यवतमाळमधील लोहारा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकावर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला जामीन देण्यासाठी त्याने तब्बल 10 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. सात लाखात तडजोड झाल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यावर शहानिशा करुन एसीबी यवतमाळने गुन्हा दाखल केला.

पोलिसानेच मागितल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा पोलीस ठाण्यातील 52 वर्षीय सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल घुगल यांना अटक करण्यात आली आहे. घुगलशिवाय विद्युत वसानी आणि विशाल माकडे (रा. यवतमाळ) या खासगी व्यक्तींवरही कारवाई करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post