लॉजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पोलिसांचा छापा....१० महिलांची सुटका

 

लॉजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पोलिसांचा छापा....१० महिलांची सुटकापुणे :  देहू रोड भागातील मुंबई-बंगळुरु महामार्गावर  द्वारका रुम्स लॉजमधील एकूण दहा महिलांना मुक्त करण्यात आलं असून त्यांना देहव्यापारत ढकलण्यात आलं होतं. या महिलांकडून अशा प्रकारचे काम करुन घेणारा लॉजचा मॅनेजर गविरंगा गौडा याला पोलिसांनी अटक केलं आहे. तर दुसरा आरोपी पोलिसांनी छापा टाकताच पळून गेला.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील देहू रोड या भागात मुंबई-बंगळुरु महामार्गावर द्वारका लॉजवर महिलांकडून देहव्यापार करुन घेतला जात होता. मागील अनेक दिवसांपासून हे सुरु होते. याची गुप्त माहिती पिंपरी-चिंचवड येथील पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सेक्युरिटी सेलची एक विशेष टीम तयार केली. या टीममध्ये तीन अधिकारी आणि 12 इतर पोलिसांचा समावेश होता. या मध्ये एका महिला पोलिसाचादेखील समावेश करण्यात आला होता. या पथकाने द्वारका लॉजवर छापेमारी करुन देहव्यापार करणाऱ्या महिलांना मुक्त केलं. तसेच लॉजच्या मॅनेजरला बेड्या ठोकल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post