धक्कादायक... महिला पोलिस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

 

धक्कादायक... महिला पोलिस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्यापुणे – शहर पोलीस दलातील महिला पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्या पोलीस दलातील गुन्हे शाखा व सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी म्हणून कार्यरत होत्या. या घटनेमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.  विश्रांतवाडी पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.


पुणे पोलिस दलाच्या विशेष विभागात शिल्पा चव्हाण कार्यरत होत्या. घटनेच्या वेळी त्यांचा स्टाफ त्यांना घरी आणण्यासाठी गेला होता. बराचवेळ फोन लावल्यानंतरही त्या फोन उचलत नव्हत्या. त्यानंतर घराचा दरवाजा ठोठावण्यात आला मात्र कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करण्यात आला. त्यावेळी शिल्पा चव्हाण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. घटनेच्या वेळी घरात दुसरी कोणतीही व्यकती नव्हती. शिल्पा यांना एका मुलगा असून तो गावी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मागील काही महिन्यापूर्वी त्यांची गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्या सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. पोलीस दलात त्याच्या आत्महत्येबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. टिव्ही ९ ने सदर वृत्त दिले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post