के.के.रेंजसंदर्भात जनरल बिपिन रावत यांच्याशी झालेली भेट...आ.निलेश लंके यांनी जागवल्या आठवणी

 आठवण..दिल्ली येथे १७ सप्टेंबर रोजी रक्षा मंत्रालय येथे संरक्षणमंत्री सन्मा.राजनाथ सिंह यांच्या बरोबर देशाचे भूषण सन्मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या मतदारसंघातील व राहुरी तालुक्यातील 23 गावातील के.के. रेंज बाबत मीटिंग झाली होती.


मिटिंग मध्ये माझा परिचय रावत साहेबांशी झाला एक मनमोकळे, अभ्यासू व्यक्तिमत्व मला दिसून आले.. लष्करातील सर्व माहितीचा अभ्यास असणारे एक चांगले अधिकारी आज हरपले, मिटिंग नंतर त्यांचे आणि माझे के.के. रेंज संबंधी संभाषण होत असे. आज अचानक ही बातमी कळाली, भारतीय सैन्यदलाचे प्रमुख जनरल बिपिनजी रावत यांच्या निधनाने भारतीय सैन्यदलाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.

लष्करप्रमुख पदानंतर तिनही सैन्यदलांच्या प्रमुखांची, संरक्षणदल प्रमुख पदाची जबाबदारी यशस्वीपणे त्यांनी सांभाळली. संरक्षणदल प्रमुख म्हणून त्यांनी तिनही सैन्यदलांत सहकार्य व समन्वय वाढवण्याचं काम केलं. प्रदीर्घ लष्करी सेवेत असंख्य लढाया व मोहिमा यशस्वी केल्या. युद्धात आघाडीवर राहून सैन्याचं नेतृत्वं केलं. सहकारी अधिकारी, जवानांचं मनोबल कायम उंच ठेवण्यासाठी प्रयत्नशील असं त्यांचं नेतृत्वं होतं. 

त्यांच्या व त्यांच्या पत्नी बरोबरच ११ जणांचे झालेले अपघाती निधन ही देशवासियांच्या मनाला चटका लावणारी व प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणणारी घटना आहे.त्यांच्या सर्वांच्या आत्म्यास शांती मिळो, भावपूर्ण श्रद्धांजली!

- आमदार निलेश लंके (पारनेर नगर विधानसभा मतदारसंघ)

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post