कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल....आ.रोहित पवार माजी मंत्री राम शिंदेंवर बरसले

 

कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल....आ.रोहित पवार माजी मंत्री राम शिंदेंवर बरसलेनगर :  कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मोठं शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले.   आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जतमध्ये शक्तिप्रदर्शन केले. 

या शक्तिप्रदर्शना पूर्वी राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर झालेल्या सभेला आमदार रोहित पवार, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड, मधुकर राळेभात, सूर्यकांत मोरे, दत्ता वारे, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, नितीन धांडे, मनिषा सोनमाळी, प्रतिभा भैलुमे, सुनील शेलार, विशाल मेहेत्रे आदी उपस्थित होते.

आमदार रोहित पवार  म्हणाले, भाजपची सभा सर्वांनी पाहिली, आम्हालाही आश्चर्य वाटले.  बाजाराच्या दिवशी सभा घेतली तर व्यापाऱ्यांचा दिवस जातो. त्यांना उमेदवार व नेते पाहून लोकांची गर्दी होईल अथवा नाही याची शंका वाटल्याने त्यांनी बाजाराच्या दिवशीच सभा घेतली, असे नाव न घेता आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना टोला लगावला.

 कर्जतमध्ये जुनी नगरपंचायत इमारत आहे. ही इमारत आज पडते की उद्या पडते अश्या धोकादायक स्थितीची आहे. कर्जतमधील सर्व प्रशासकीय कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी निधी आणला. कामे सुरू होणार आहेत. हे पाहून ते इमारत दोन किलोमीटर लांब नेली अशी टीका करतात. पण इमारत जुनी होती. तुम्ही मंत्री होते, त्यावेळी झोपले होते काय? तुम्ही स्वराज्य ध्वजा बद्दल बोललात. परत पातळी खाली घेतली तर लोकशाही व जनतेच्या माध्यमातून दाखवून देईल. फक्त दोन वर्षात तुमची ही परिस्थिती झाली. पुढील दहा वर्षांत तुम्हाला कोणी ओळखू शकणार नाही, अशी परिस्थिती लोक निर्माण करतील, असा इशाराही आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांचे नाव न घेता दिला.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post