'ओमिक्रॉन'चा धसका... डॉक्टरने पत्नीसह दोन मुलांची केली हत्या


'ओमिक्रॉन'चा धसका... डॉक्टरने पत्नीसह दोन मुलांची केली हत्या लखनौ : डॉक्टर पतीने पत्नी आणि दोन मुलांची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये शुक्रवारी उघडकीस आला. हत्येनंतर आरोपी डॉक्टर सुशील कुमार पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. “ओमिक्रॉन सर्वांचा जीव घेईल” अशी भीती व्यक्त करत त्याने हातोड्याने वार करत कुटुंब संपवलं.

हत्येच्या ठिकाणी सापडलेल्या डायरीवरुन डॉक्टरला ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटविषयी चिंता सतावत असल्याचं दिसतं. “ओमिक्रॉन सर्वांचा जीव घेईल, माझ्या निष्काळजीपणामुळे, मी अशा ठिकाणी अडकलो आहे, जिथून बाहेर पडणं कठीण आहे.” असं डॉक्टरने डायरीत लिहिलं आहे. 

डॉ. सुशील कुमार हा कानपूरमधील एका हॉस्पिटलमध्ये फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख म्हणून कार्यरत आहे. त्याने 48 वर्षीय पत्नी, 18 वर्षीय मुलगा आणि 15 वर्षीय मुलीची हत्या केली. त्यानंतर भावाला फोन करुन त्याने या तिहेरी हत्याकांडाची माहिती दिली आणि पोलिसांना बोलवायला सांगितलं. मात्र भाऊ किंवा पोलीस येण्याच्या आतच तो घटनास्थळावरुन परागंदा झाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post