गांधींना शिव्या दिल्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही, नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ हे भगवान विष्णूंचे अवतार


गांधींना शिव्या दिल्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही, नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ हे भगवान विष्णूंचे अवतार नवी दिल्ली: छत्तीसगडमधील रायपूर येथे धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये महाराष्ट्रातील संत कालीचरण यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना टीकेचा सामना करावा लागला. तसेच छत्तीसगड पोलिसांनी त्यांच्यावर एफआयआर दाखल केला. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरवर कालीचरण महाराजांनी महात्मा गांधींना शिव्या दिल्याचा आपल्याला कोणताही पश्चाताप नाही, असं म्हटलंय. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भगवान विष्णूचा अवतार देखील म्हटलंय.

न्यूज १८ इंडिया या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात कालीचरण महाराज यांनी हजेरी लावली. यावेळी अँकरने त्यांना विचारले की, राष्ट्रपिता महात्मा गांधींना तुम्ही शिवीगाळ केली? हे खरे आहे का? प्रत्युत्तरादाखल कालीचरण म्हणाले, “मला गांधींना शिव्या दिल्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही. शिव्या रागाने बाहेर येतात, माझ्या मनातल्या वेदना जाग्या झाल्या, त्यामुळे मी ते बोललो.”

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post