कर्जतच्या राजकारणात खळबळ... राष्ट्रवादीकडून दमदाटी झाल्याचा उमेदवारी मागे घेणार्या भाजपच्या कचरेंचा आरोप... व्हिडिओ

 आ. रोहित पवारांची पोलखोल, अनिल कचरेनी दिली दमदाटी झाल्याची माहितीकर्जत (आशिष बोरा):- कर्जत नगर पंचायत निवडणुकीत जोगेश्वरवाडी प्रभागाच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या रणकंदना मध्ये तेथील उमेदवाराचे पती अनिल कचरे यांच्या व्हिडीओने कर्जतचे राजकारण ढवळून निघाले असून कचरे यांची उमेदवारी दबावाने काढून घेऊन आपला उमेदवार बिनविरोध करण्यासाठी आ रोहित पवार यांनी आटापिटा केल्याचा प्रा राम शिंदेच्या आरोपाला पुष्टी मिळाली असून यावर लोकशाहीचे  गोडवे गाणारे आ. रोहित पवार काय उत्तर देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

               कर्जत नगर पंचायत निवडणुकीत आ रोहित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते दडपशाही करत आहेत, आमिष दाखवत आहेत, असा गंभीर आरोप भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा राम शिंदे यांनी केला असून अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्र 2 च्या भाजपाच्या उमेदवार सौ नीता अजिनाथ कचरे व त्याच्या जाऊबाई पूजा अनिल कचरे यांना भाजपाने उमेदवारी दिली होती. मात्र शेवटच्या तासाभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या या दोन्ही महिला उमेदवारांना आणले व अर्ज माघारी घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे पुढे उभे केले. यावेळी मोठा गोंधळ झाला, निवडणूक निर्णय अधिकारी व प्रशासनावर भाजपाने आक्षेप घेत पवारांच्या दबावाला प्रशासन साथ देत असल्याचा आरोप केला. मात्र या गोंधळाच्या वातावरणात या दोन्ही ही महिलांनी आपले अर्ज मागे घेतले.  यानंतर आ. रोहित पवार यांनी आपण लोकशाहीला मानणारे आहोत, कचरे यांनी घरगुती अडचणीमुळे माघार घेतली मी याच्याशी कधीही संपर्क केला नाही असे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. याशिवाय माजी नगरसेविका नीता कचरे यांनी ही अशाच पद्धतीने मनोगत देऊन  आपली बाजू मांडली.

 मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपाने दुसऱ्या क्रमांका ची उमेदवारी दिलेले पूजा अनिल कचरे यांचे पती अनिल कचरे यांनी आम्ही भाजपाला मानणारे आहोत, प्रा राम शिंदे यांनी आमचे गोरगरीब जनतेचे अनेक कामे केली आहेत. भाजपाचे आमच्यावर खूप उपकार आहेत मात्र अर्ज काढण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आमच्या घरी येऊन महिलांना दमदाटी करून त्याच्या कुटुंबियांना काही कळू दिले नाही व एक दोन कारणे सांगत आमचा अर्ज काढून घेतला असे निवेदन व्हिडीओ द्वारे प्रसिद्ध केले आहे, या खुलाश्याने आ. रोहित पवार यांचा लोकशाही मानण्याचा दडपशाही केली नसल्याचा दावा फोल ठरला असून कर्जत शहरात विकासाचे राजकारण करण्याचा दावा ठोकणारे पवार यांचे अनेक पत्ते उलटे पडत आहेत असे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी म्हणतानाच त्यांच्या कार्यकर्त्यामार्फत 

 श्री गोदड महाराजाच्या दारात मौन आंदोलन केलेल्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून ती जागा स्वच्छ करण्याचा व त्याचा व्हिडीओ काढून तो प्रसारित करण्याचा व यातून प्रसिद्धी मिळविण्या सारखे एकदम खालच्या पातळीवर जाऊन केलेले कृत्य  निषेधारर्य असून जागृत असणारे आपले महाराजांचे देवस्थान नक्कीच राम शिंदे व कर्जतकरांना न्याय दिल्या शिवाय राहणार नाही ..! अशी अपेक्षा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी व्यक्त केली आहे.

व्हिडिओ
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post