कडाक्याच्या थंडीत राज्यावर पावसाचं सावट... हवामान खात्याचा अंदाज

 

कडाक्याच्या थंडीत राज्यावर पावसाचं सावट... हवामान खात्याचा अंदाजपुणे : कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्यावर २८ डिसेंबरपासून पुन्हा पावसाचे सावट आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारपीट आणि विजांच्या कडकडाटात पाऊस, तर उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकण विभागात मात्र हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.महाराष्ट्रासह उत्तर आणि मध्य भारतातही अनेक ठिकाणी या काळात पाऊस होणार आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात बहुतांश भागात पाऊस झाला. दुसऱ्या आठवडय़ापासून कोरडे हवामान निर्माण झाले. त्यानंतर उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह येऊ लागल्याने काही प्रमाणात थंडी अवतरली. विदर्भात दोन ते तीन दिवस थंडीची लाट होती. मात्र उत्तरेकडून येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह मंदावल्यानंतर तापमानात काही प्रमाणात वाढ झाली. सध्या उत्तर भारतामध्ये वाऱ्यांची चक्रीय स्थिती आहे. या भागात कमी दाबाचा एक पट्टा तयार होणार आहे. त्याचप्रमाणे दक्षिण-पश्चिम राजस्थान ते थेट विदर्भापर्यंत कमी दाबाचा एक पट्टा तयार होतो आहे. हा पट्टा पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश ओलांडून येणार आहे. त्याचा परिणाम म्हणून या सर्व भागांसह महाराष्ट्रातही २८ आणि २९ डिसेंबरला काही भागांत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post