नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात...क्रूझर व कंटेनरच्या धडकेत ३ ठार


नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात...क्रूझर व कंटेनरच्या धडकेत ३ ठार नगर:  नगर-मनमाड महामार्गावर  गुहा गावाजवळील  गुहापाटाच्या पुढे चार वाहनांच्या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू  झाला. एकेरी वाहतुकीमुळे समोरासमोर झालेल्या या अपघातात ठार झालेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.  गुरूवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. शिर्डीहून शिंगणापूरकडे साईभक्तांना घेऊन जाणारी भाडेपट्ट्याने चालणारी क्रूजर (क्रमांक- एमएच 20 इजी 1402) व नगरहून मनमाडकडे  जाणार्‍या कंटेनर (क्रमांक एचआर 45 बी 4470) यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये दोन दुचाकीही सापडल्या. 

या महामार्गाचे सध्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे एकाच बाजूने वाहतूक चालू होती. कंत्राटदाराने कुठेही मार्गदर्शक फलक लावलेला नाही. रात्री चालकांसाठी रेडियम पट्टी लावलेल्या नाही. त्यामुळेच हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर चालक पसार झाला.

अपघाताची खबर मिळताच पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

साईबाबा संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे, सोमनाथ कुलकर्णी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post