एमआयडीसीत सन फार्मा कंपनीत भीषण आग, एकाचा मृत्यू


एमआयडीसीत सन फार्मा कंपनीत भीषण आग, एकाचा मृत्यूनगर:   नागापूर एमआयडीसीततील सन फार्मा कंपनीच्या एका प्लांटला बुधवार रात्री नऊच्या सुमारास अचानक आग लागली. या कंपनीच्या आवारात वेगवेगळे प्लॅट असून आतील एका प्लाॅन्टला ही आग लागली होती. ही नेमकी कशामुळे लागली हे उशिरा पर्यंत समजू शकले नाही.

यावेळी त्या ठिकाणी दोन कर्मचाऱ्यांची ड्युटी होती. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. आग विजवल्या नंतर त्याचा मृतदेह तेथून हलवण्यात आला.

सात नंबरच्या प्लांट जवळ दोन कर्मचाऱ्यांची ड्युटी होती. त्यातील एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. दुसरा कर्मचारी सुखरूप असल्याचे समजते. दरम्यान आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, एमआयडीसीचे सहायक निरीक्षक युवराज आठरे फौजफाट्यासह दाखल झाले आहेत. त्याचबरोबर महापालिकेचे विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे यांनी देखील कंपनीत धाव घेतली. एमआयडीसी, अहमदनगर आणि राहुरी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post