राजकारणातील उलटा प्रवास... माजी आमदार बनले ग्रामपंचायत सदस्य...

 

राजकारणातील उलटा प्रवास... माजी आमदार बनले ग्रामपंचायत सदस्य...अकोट : अकोला जिल्ह्यातील अकोट विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रतिनिधत्व करणारे माजी आमदार संजय गावंडे हे मरोडा ग्रामपंचायतचे सदस्य झाले आहेत. ते अविरोध निवडून आले आहेत. तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणासाठी माजी आमदारांनी उलटा प्रवास करीत ग्रामपंचायत निवडणूक लढविल्याची चर्चा आहे.अकोट तालुक्यात 33 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीमध्ये माजी आमदार संजय गावंडे व पत्रकार चंद्रकांत पालखडे यांच्यासह १८ उमेदवार अविरोध निवडून आले. पाच ग्रामपंचायतींमध्ये सात सदस्यांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. ८२ मधील ४२ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले नाही तर पंचावन्न उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. त्यामध्ये ओबीसीच्या १० जागांच्या निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे. अकोट तालुक्यात ८२ जागांसाठी ३३ ग्रामपंचायतमध्ये पोटनिवडणूक होऊ घातली आहे. यामधील अठरा ग्रामपंचायतमध्ये केवळ एक एक नामनिर्देशन पत्र शिल्लक राहिल्याने १८ उमेदवार बिनविरोध झाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post