ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांचे राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांना भावनिक आवाहन....

 ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांचे राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांना भावनिक आवाहन.... नगर (सचिन कलमदाणे):. ग्रामसेवक युनियन डीएनई १३६ च्या कामकाजाबाबत राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी महत्वाचे निवेदन प्रसारित केले आहे.

            *सर्व सभासद बंधू आणि भगिनींना सप्रेम नमस्कार विनंती विशेष मी एकनाथराव ढाकणे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन आपणास नम्र पूर्वक निवेदन सादर करीत आहे की सोशल मीडियावर व्हाट्सअप द्वारे आपल्या संघटनेचे काही सभासद वेगवेगळे मतमतांतरं व्यक्त करत आहे. काही टीका करत आहेत.काही प्रश्न सोडवा म्हणत आहेत. अन्य काही बाबतीत एकमेकांवर चिखलफेक करत आहे. सर्वसामान्य सभासदाच्या भावना मी समजू शकतो परंतु राज्य युनियनचे निवडून आलेले पदाधिकारी आहेत. त्यांनी ग्रामसेवक युनियन कामकाजाबाबत अनभिज्ञ राहावं ही मोठी शोकांतिका आहे.राज्य अध्यक्ष, राज्य सरचिटणीस, राज्य कोषाध्यक्ष हे सत्ताधारी आहेत आणि बाकीचे सारे राज्य पदाधिकारी विरोधी आहेत का ते आता शोधावा लागेल असे वाटत आहे.मी प्रामाणिकपणे राज्य ग्रामसेवक युनियन कामकाज तन-मन-धनाने 24 तास कार्यरत राहून करता आहे. यापूर्वीच्या कालखंडामध्ये अनेक प्रश्नांची उकल झालेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामविकास अधिकारी 3500 ग्रेड पे पस्तीसशे रुपये बजेट तरतूद करून घेणे, कंत्राटी सेवाकाल नियमित करणे राज्य स्तरावर आदर्श ग्रामसेवक पुरस्कार लागू करणे, राज्य स्तरावर ग्रामसेवकांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार लागू करणे, ग्रामसेवकांचा सुधारित जॉब चार्ट निश्चित करणे, ग्रामसेवकावरील सरपंचावरील फौजदारी गुन्हे यांचा परिपत्रक मागे घेणे, ग्रामसेवकांचा प्रवास भत्ता वाढ करणे, covid-19 मध्ये मृत्युमुखी पडलेल्या ग्रामसेवकांना कुटुंबियांना 50 लक्ष रुपये विमा कवच मिळवून देणे,  याबाबतच्या धोरणामध्ये बदल करणे यासारखे प्रश्न प्रामुख्याने सुटलेले आहेत आणि हे सर्व सामूहिक संघशक्ती तुन शक्य झाले आहे असे मला वाटते.*


       *शिवाय पारदर्शकपणे प्रश्न सोडवले आहेत, दोन-तीन वेळा जबर संघर्ष केलेला आहे,संघर्ष करत असताना संघर्षाचा कालावधीमधील विना वेतन सर्व पगार वेळीच चोवीस तासाच्या आत ग्रामसेवकांच्या पगार खाते उपलब्ध करून दिलेला आहे आणि प्रामुख्याने ग्रामसेवक संघटना सक्षमीकरण असेल जिल्हे बळकटीकरण असेल कार्यकर्ता सक्षम घडवण्याच्या दृष्टीने वाटचाल असेल सेवानिवृत्तांना संघटनेमध्ये स्थान नसेल. राज्य ग्रामसेवक यांची सुधारित घटना 2016 निर्मिती असेल, ग्रामसेवक युनियनमध्ये विस्तार अधिकारी यांना बाजूला काढण्याचा प्रश्न असेल. सातव्या वेतन आयोगा मध्ये ग्रामविकास अधिकारी यांना सुधारित वेतन श्रेणी मंजूर करण्याचा प्रयत्न असेल या प्रश्नांना प्रथम प्राधान्य देऊन संघटना चळवळ भक्कम केली आहे आणि पुढे सुद्धा करत राहणार आहे. परंतु अलीकडच्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये तुमचा सर्वांच आणि माझं महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल कोरोना महामारीचा राष्ट्रीय आपत्ती निर्माण झाली आणि यामध्ये सर्व कामकाजाला मर्यादा आल्या. आर्थिक प्रश्न सोडवणे याला मर्यादा आल्या. शासनाची भूमिका कर्मचारी विरोधी दिसून आली covid-19 मुळे कामकाज एक वर्षभर ठप्प होते. त्या अगोदर नवीन सरकार आले होते सरकार बदल झाला आणि हे सर्व करत असताना प्रामाणिकपणे मी आणि माझे सर्व सहकारी मंत्रालयीन स्तरावर प्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अलिकडच्या एक वर्षभरामध्ये आपल्या संघटनेबरोबर उपमुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री, ग्रामविकास राज्यमंत्री,  अतिरिक्त प्रधान सचिव, उपसचिव ग्रामविकास यांच्याबरोबर अधिकृत संघटनांच्या बैठका होऊन इतिवृत्त प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये आपल्या प्रश्नांना निर्णायक भूमिका घेण्याची मंत्रीमहोदय प्रशासनाने मान्य केले आहे त्याचा पाठपुरावा चालू आहे.सरकारमध्ये ग्रामविकास विभागामध्ये नेहमीच कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत चिंतेची भूमिका राहिली आहे. असे असताना सरकारला सकारात्मक बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.प्रामुख्याने पंचायत विकास अधिकारी पदनिर्मिती याबाबत सरकारने कमिटी गठण केलेला आहे. परंतु पाच महिन्यापासून राज्यमंत्री कार्यालयात त्याबाबत जलद गतीने पाठपुरावा चालू आहे. ग्रामसेवक पदवीधर सेवा नियम बनवणे करणे या फायलीला लवकरच मंजुरी मिळेल असे अपेक्षित आहे.ग्रामसभा राष्ट्रीय दिनाच्या दिवशी न घेण्याची भूमिकेचा धोरण मंजूर असेल अतिरिक्त काम कमी करणे आणि कलम 49 मध्ये सुधारणा करणे सहा महिन्यांमध्ये पुढील अधिवेशनापर्यंत हा विषय निकाली निघेल.याची शंभर टक्के खात्री आहे आणि उर्वरित छोट्या-मोठ्या प्रश्नासाठी पाठपुरावा सुरू आहे नरेगा साठी स्वतंत्र यंत्रणा फळबाग लागवड वरील बहिष्कार याबाबत सरकारने घेतलेली भूमिका ग्रामसेवकाकडून फळबाग लागवडीचे काढलेलं काम स्वाक्षरी गरज भासणार नाही.असे झालेला निर्णय आणि गावठाण आणि गावठाण बाहेरील क्षेत्राबाहेरील एक जानेवारी 2022 पासून ग्रामसेवक युनियनचे असहकार आंदोलन हे निर्णय एकटे राज्य ग्रामसेवक संघटना हाताळत आहे. असे असताना 22000 ग्रामसेवकांनी जागवा संघटना वाचवा राज्याध्यक्ष यांनी राजीनामा द्यावा.अशा प्रकारच्या निवडक बातम्या सोशल मीडियावर ग्रुप वर व्हायरल होताना दिसत आहे. खेदाने नमूद करावेसे वाटते.राज्य ग्रामसेवक युनियन मध्ये अशी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली नाही. मी असेल अथवा नसेल परंतु सरकारमध्ये काही वेळ द्यावाच लागतो.तरुण नेतृत्व गरम रक्ताचे नेतृत्व वाटले.बातम्या टाकून लगेच प्रश्न सुटतील असे काही होत नाही.त्यांचे मत तात्काळ निर्णय घ्यावा मुंबईला तळ ठोकून बसा व आंदोलन करावं अशी भूमिका दिसून येत आहे.नजीकच्या काळात आपण आंदोलन नक्की करणार आहोत परंतु संवादातून काही सकारात्मक निघते का याची चाचपणी सध्या चालू आहे. मंत्रीमहोदयांच्या गाठीभेटी झालेले आहे. सेक्रेटरी महोदया बरोबर सकारात्मक चर्चा झाली आहे आणि पंचायत विकास अधिकारी पदनिर्मिती 100% प्रश्न सुटण्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. असे असताना अचानक संप पुकारला आंदोलन करणे मागील कालखंडाचा अनुभव पाहता पुन्हा मधला अनुभव म्हणून तूर्त संवाद करत आहोत. याचा अर्थ संघटना वाघाची राहिली नाही राज्याध्यक्ष गप्प बसलेली आहे.असा अर्थ काढणे अतिशय चुकीचं आणि धोकादायक आहे. मला सुद्धा वाटते तळमळीने प्रामाणिकपणे वाटतंय की माझ्या कालखंडामध्ये जास्तीचे प्रश्न सुटले पाहिजे आणि त्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. पत्रव्यवहार करत आहे. परंतु सरकार कडून पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे आणि कोरोना प्रादुर्भाव झाल्यामुळे या सर्व प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत. नजीकच्या कालखंडामध्ये आपले प्रॉब्लेम सॉल करूया आणि शंभर टक्के प्रश्‍न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहुयात नाही संवादातून सुटले नाहीतर शंभर टक्के आंदोलनात्मक पवित्रा घेऊया काळजी नसावी. राहिला प्रश्न चाटोगिरीचा आपण आपली भाषा लोकशाही मध्ये बसेल अशा प्रकारचे वापरली पाहिजे.या मताचा मी आहे. आपण सर्व विचार बाकी सर्व मूर्ख असं होऊ शकत नाही. माझे सर्व जिल्हाध्यक्ष सचिव आणि राज्य कार्यकारणी पदाधिकारी खूप विचारवंत आहेत.खूप विचारमंथन होऊन निर्णय घेतले जातात. अविचाराने कोणताही निर्णय घेतला जात नाही. मी सरसेनापती कार्यरत असताना माझे सैनिक सुरक्षित रहावे मरू नयेत.अशी सुद्धा खूप गरजेचे बाब आहे आणि त्यादृष्टीने मी दक्षता घेत आहे. प्रत्येक जण सांगत आहे व एसटी महामंडळाचा आंदोलन पहा तर खरोखर त्याचा अंतर्मुख होऊन महामंडळाच्या आंदोलनाचा अभ्यास करा. काय झालेला आहे आणि एसटी महामंडळातील कर्मचारी हे कामगार आहे स्वतंत्र महामंडळ आहे. त्यांच्या मागण्या वेगळ्या आहेत त्यांचे कामकाज वेगळा आहे आणि ग्रामसेवक  शासकीय नोकर आहेत. त्यांचे प्रश्न वेगळे आहेत त्यांचे कामकाज वेगळा आहे सेवाशर्ती वेगळा आहे. याचं अवलोकन होणं खूप गरजेचं आहे. उद्या परवा मंत्रालयात थांबून याबाबत उपाययोजना करण्याचे प्रयत्न चालू राहतील. नजीकच्या काळात राज्य कार्यकारणी मध्ये सविस्तर चर्चा होऊन संवादातून अधिवेशना मधून अथवा संघर्षातून प्रश्न सोडवायचा निर्णायक लढा निश्चित केला जाईल, काळजी नसावी!  तसेच काही सभासद अथवा बिगर सभासद राज्य युनियन वाचवा म्हणून टाहो फोडत आहेत. काही जिल्ह्यांमधील राज्याध्यक्ष राज्य सरचिटणीस भांडणे निर्माण करत आहेत असे सांगत आहेत, परंतु सभासदांना पूर्ण ज्ञान अवगत आहे.पुणे जिल्ह्यामधील वातावरण संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे.गैरवर्तन   झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांवर आपण कार्यवाही केली आहे आणि निवडणुका झाल्यानंतर दोन्ही गटाचे मनो मिलन झाल्यानंतर त्यांना संलग्नता सुद्धा दिलेली आहे. असे असताना पूर्वग्रहदूषित जाणीवपूर्वक टीकाटिपणी करून चुकीच्या बातम्या प्रसारित करणे थांबवणे त्यांनी खूप गरजेचे आहे.अन्यथा जशास तसे उत्तर त्यांना देणे सुद्धा क्रमप्राप्त आहे.तसेच लातूर जिल्ह्यातील निवडणुकीबाबत प्रोग्राम जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर काही क्रिया प्रतिक्रिया उमटण्याची आलेले आहेत. दहा ते पंधरा वर्षात जिल्ह्यात निवडणुका न होणं हीच मोठी शोकांतिका आहे.अनेक सभासद तालुकाध्यक्ष सचिवांची निवडणूक घ्यावी म्हणून सातत्याने राज्य ग्रामसेवक युनियनकडे मागणी आल्यामुळे आणि कार्यरत जिल्हाध्यक्ष विस्ताराधिकारी झाल्यामुळे जिल्ह्याचे संघटनेचे कामकाज ठप्प होऊ नये म्हणून राज्य संघटनेने निवडणूक प्रोग्राम लावलेला आहे. आणि तो विहित मुदतीत पूर्ण होईल याची खात्री आहे.नव्या उमेदीने कार्यकर्त्यांना संधी देणे गरजेचे आहे आणि त्या दृष्टीने या ठिकाणी आपण प्रोग्राम लावलेला आहे.यापूर्वी मागील पदाधिकाऱ्यांना सुद्धा अनेक वेळा संधी देऊन सुद्धा युनियन वर्गणी असेल थकीत वर्गणी असेल महा अधिवेशन वर्गणी असेल व राज्य कार्यकारिणीच्या सभा असेल तालुकाध्यक्ष सचिवाच्या निवडणुका असतील याबाबत पाठपुरावा झालेला नाही यामुळे निर्णय झालेला आहे.*


       *कोल्हापूर जिल्ह्यातील राज्यांची सेवानिवृत्त माजी पदाधिकारी यांच्याकडून सुद्धा अनेक वेळा राज्य व त्यांच्या नेतृत्वावर कामकाजावर लेखापरिक्षण अहवालावर टीकाटिपणी होत आहे. कोल्हापूरमध्ये संघ संघटनेचा वाद पतसंस्थेच्या निवडणुकीचा वाद आणि नव्याने झालेल्या निवडणुका त्यामध्ये झालेले मतमतांतरे यामध्ये राज्य ग्रामसेवक संघटनेचा कोणताही संबंध नाही‌ ्आ‌पण नियमाने त्या ठिकाणी निरीक्षक निवडणुका पूर्ण झालेले आहेत तसेच अन्य जिल्ह्यांमध्ये जे काही काम का चालू असतं ते जिल्हास्तरावर मिटवले जावं राज युनियन कडे पत्र व्यवहार झाल्यानंतर त्याची कार्यवाही करणे क्रमप्राप्त होतं. सर्वांना समान न्याय देण्याच्या धोरणातून निर्णय घेतले जातात कोणावर अन्याय होऊ दिला जात नाही अशी भूमिका यामागची असते काही नाराज असंतुष्ट कार्यकर्ते चुकीचे मेसेज टाकतात. लाईक करतात वृत्त त्यामागची पार्श्वभूमी वेगळी असते. ्पु‌णे जिल्ह्यातील शेख नामक व्यक्ती अतिशय खालच्या पातळीला जाऊन भाषा वापरून सर्व संवर्गात आ राज्य पदाधिकाऱ्यांचा वर्गाचा नेतृत्वाचा अपमान करत आहेत. जिल्हाध्यक्ष सचिवांना पार्टी देऊन विकत घेतले जाते असं अशोभनीय वक्तव्य केलं जातं. जिल्हा अध्यक्ष सचिव खूप प्रामाणिक पणे आहेत त्यांना लोकशाही कळते समाजामध्ये मान सन्मान मिळवणारे व्यक्ती आहेत आणि अशा व्यक्ती बद्दल बोलणे राज्य संघटनेचे पदाधिकारी बद्दल बोलणे यांची लायकी तपासून यांनी बोलले पाहिजे. ते सुद्धा महत्वाचा आहे. विचारपूर्वक केलं पाहिजे असो मी सोशल मीडियावर टीका टिपणी चा विरोधात मत व्यक्त करत नाही कारण 22000 ग्रामसेवक शेकड्यांनी ग्रुप हे जर करत बसलो तर त्याच्या व्यर्थ वेळ वाया जातो. परंतु जे खरं आहे सत्य आहे त्याच्या बाजूने ज्ञानी विचारवंत सभासदांनी पदाधिकाऱ्यांनी योग्य भूमिका घेतली पाहिजे. राज्य कामकाजामध्ये पारदर्शकता प्रामाणिकपणा हे प्रश्न सोडवण्यासाठी तळमळ आहे.परंतु दोन वर्षापासून प्रचंड अडचणी निर्माण झालेले आहेत.घराबाहेर पडणे सुद्धा शक्य शक्य नव्हतं तरी सुद्धा जीव धोक्यात घालून प्रामाणिकपणे संवर्गाच्या तळमळे साठी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढील कालखंडात सुद्धा अधिक नेटाने जोमाने काम करूया एकच मिशन जस जुनी पेन्शन तसेच एकच धोरण पंचायत विकास अधिकारी पदनिर्मिती करणे आणि ग्रामसेवकाचा वेतन त्रुटी चा प्रश्न निर्माण झालेला आहे. तो सोडवण्यासाठी जीवाचं रान करून हा प्रश्न सोडवणे प्रामाणिक प्रयत्न राहील या या प्रकारची ग्वाही सर्व सभासदांना देतो कमलेश बिसेन हा सुद्धा राज्य युनियनचा पदाधिकारी युवा कार्यकर्ता आहे हे सातत्याने प्रश्नाबद्दल बोलत असतो भूमिका मांडत असतो.त्या भूमिकेबद्दल आम्ही विचारमंथन करत असतो आत्मचिंतन करत असतो.परंतु इतक्या टोकाची भूमिका मांडणी सुद्धा संयुक्तिक नाहीये तसेच मी राज्यातील 22 हजार लोकांचे फोन कॉल रिसिव्ह करत असतो रिसीव न झाल्यास पुन्हा मिस कॉल नंतर माझ्याकडून कॉल करत असतो ही माझी भूमिका आहे असे होणार नाही भविष्यात सुद्धा होणार नाही आपण केव्हा ही सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत मला कॉल करू शकता परंतु कधी फोन लागला नसेल तर त्याचा बाऊ करण्याची गरज नाही उद्या आणि परवा दोन दिवस मुंबईला जाऊन प्रलंबित फायलींचा पाठपुरावा करूया माझ्याबरोबर निवडून आलेले पदाधिकारी आणि मी नियुक्त केलेले पदाधिकारी असे जवळपास छत्तीस पदाधिकारी कार्यरत आहेत.प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी या पुढील वर्षभराच्या कालखंडामध्ये आपणास जे जे काम दिलेली आहेत ती प्रमाणे पुणे तन-मन-धनाने पण इतर पार पाडली तर राज्य ग्रामसेवक युनियनच्या जो काय डोलारा आहे तो नेटाने पुढे जाण्यास मदत होईल अशी आपणांकडून अपेक्षा व्यक्त करतो ग्रामसेवक युनियनच्या मान्यतेच्या बाबतीत आपणाकडे याद्या जिल्हा शाखेच्या मागणी केलेली असताना अद्याप पावेतो दहा जिल्हाध्यक्ष सचिवाकडून याद्या प्राप्त झालेले नाहीये व प्रश्न सुद्धा प्रलंबित राहिलेला आहे.आर्थिक सामाजिक प्रश्न बरोबर राज्य ग्रामसेवक युनियन ताठ मानेने समाजात सरकारबरोबर संघर्ष करण्यासाठी उभे राहिले पाहिजे आणि त्यांना सर्व प्रक्रियेचे मान्यता आवश्यक आहे ही बाब सुद्धा खूप गरजेचे आहे तसेच चार दोन व्यक्ती महाअधिवेशनाच्या पैशाचा भाऊ करत असतात.अधिवेशन घ्या म्हणत असतात काही बांधव पैसे वाटून द्या म्हणत असतात.काही बांधव हिशोब द्या म्हणत असतात आपल्याकडे 57 लाख रुपये वसूल झालेले आहेत पन्नास लाख रुपये बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये डिपॉझिट केलेले आहे.पाच लाख रुपये राज्य ग्रामसेवक युनियनच्या अधिवेशन खात्यावर जमा आहेत.दोन लाख रुपये राज्य ग्रामसेवक युनियनच्या कोषाध्यक्ष सरचिटणीस खात्यामध्ये येणे आहे आणि बत्तीस लाख रुपये वर्गणी जमा होऊन सुद्धा जिल्हा अध्यक्ष सचिव यांनी राज्य ग्रामसेवक युनियन कडे दिले नाही त्यामध्ये प्रामुख्याने शंभर टक्के अधिवेशन निधी न दिलेली खालील जिल्हे आहे पुणे लातूर वाशिम रायगड गडचिरोली धुळे आणि अंशता जमा केलेली आणि अंशता बाकी असलेले खालील जिल्हे आहेत सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी जालना उस्मानाबाद नांदेड अकोला अमरावती नागपूर ठाणे आधी जिल्ह्यातून अधिवेशन वर्गणी बाकी आहे असे असताना कोट्यवधी रुपये जमवले याचा भ्रष्टाचार केला अशा प्रकारच्या वल्गना काही विघ्नसंतोषी लोक करत असतात.जाणीवपूर्वक कळत असताना झोपेचं सोंग घेऊन त्याला जागं करणं हे खूप कठीण काम असतं आणि या लोकांना फक्त टीका करण्याचं काम असतं परंतु नक्की या पैशाचा सदुपयोग होईल छान पैकी प्रश्न सुटण्यासाठी सभासदांच्या जागृतीसाठी परिसंवादासाठी आपलं स्टेटस सभासदांचे उंचावण्यासाठी एक छान पैकी महाअधिवेशन नजीकच्या काळात होईल याबद्दल कोणीही शंका घेऊ नये वाघाची संघटना आहे भविष्यात सुद्धा वाघाची संघटना राहील हा सुद्धा वाघाचीच आहे हेसुद्धा सर्वज्ञात घेतलं पाहिजे अलीकडील दोन वर्षाच्या कालखंडामध्ये काही अपवाद जिल्हे वगळता बहुतांशी जिल्ह्यांनी राज्य ग्रामसेवक मूल्यांची संलग्नता वर्गणी दिलेली नाही जवळपास एक कोटी रुपये थकीत आहेत परंतु सर्व जिल्ह्यांनी वर्गणी सभासदाकडून बसून केलेली आहे पैसा नसताना काटकसर करून राज्य विज्ञान चा कारभार चालवला जात आहे हेसुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे भविष्यात आपली वर्गणी जिल्हा थकित तात्काळ जमा करावी ही अपेक्षा व विनंती राहील तसेच मी आणि राज्य सरचिटणीस प्रतिनियुक्ती न घेता ग्रामपंचायती सांभाळून शक्यतो जास्तीचा वेळ ग्रामसेवक होण्यासाठी देण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे पाच वर्ष लाखो रुपये संवर्गाचे वाचवलेले आहेत हे सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे असो आपण सर्व खूप संघर्षातून समृद्धीकडे वाटचाल करणारे ग्रामीण भागात तळमळीने काम करणारे प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारे राज्य ग्रामसेवक युनियनचे उमेद कार्यकर्ते आहात निराश होता कामा नाही अपयशातून यशाकडे शिखर गाठणारे आपण माणसं आहोत नजीकच्या काळात एक समृद्ध सभासद घडवण्यासाठी  कटिबद्ध राहूया अशाप्रकारची ग्वाही देतो आपलं सहकार्य सदैव असेच राहू अशी सदिच्छा व्यक्त करतो गुन्हा नेटाने कामाला लागू या अशी अपेक्षा व्यक्त करतो.*

🙏🙏🙏🙏

     *जय हिंद जय महाराष्ट्र*


       *सदैव आपलाच*

   *एकनाथरावजी ढाकणे*

        *राज्याध्यक्ष*

       *प्रशांत जामोदे*

    *राज्य सरचिटणीस*

       *संजीव निकम*

      *राज्य कोषाध्यक्ष*

  *महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन*

          🙏🙏

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post