स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांआधी स्वगृही ठाण मांडणार्या अधिकार्यांच्या जिल्हा बाहेर बदल्या, राज्य निवडणूक आयोगाचे आदेश


स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांआधी स्वगृही ठाण मांडणार्या अधिकार्यांच्या जिल्हा बाहेर बदल्या, राज्य निवडणूक आयोगाचे आदेशमुंबई:  2022 मध्ये होणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा आणि महानगरपालिका तसेच ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच जिल्ह्यात 3 वर्षांपेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या शासकीय अधिकार्‍यांची तातडीने बदली करा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढले आहे.2022 मध्ये राज्यात 15 महानगर पालिका, 25 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणार्‍या 283 पंचायत समिती, 213 नगरपरिषदा, आणि सुमारे 2 हजार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिका निवडणुका होणार आहेत. या निवडणूका निष्पक्ष व निर्भय वातावरणात होण्यासाठी एकाच जिल्ह्यात 3 वर्षाचा कार्यकाळ मार्च 2022 पर्यंत पूर्ण होत असल्या सर्व विभागातील आढावा घ्यावा, तसेच स्वगृह जिल्ह्यात नियुक्तीस असणारे अधिकारी यांची माहिती घेवून त्यांची बदली करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिल आहेत. राज्य निवडणुक आयोगाच्या या आदेशामुळे आता राज्य सरकारला राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी व तहसिलदार तसेच पोलीस निरीक्षक, पोलीस उपआधीक्षक व निवडणूक कामकाजाशी संबंधित इतर सर्व अधिकारी यांच्या बदल्या कराव्या लागणार आहेत

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post