जिल्हा परिषद शाळेत करोनाचा शिरकाव... मुख्याध्यापकासह विद्यार्थी बाधित

 

जिल्हा परिषद शाळेत करोनाचा शिरकाव... मुख्याध्यापकासह विद्यार्थी बाधितपाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील करोना पॉझिटिव्ह निघालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांची तपासणी केली. त्याचबरोबर इतरही काही विद्यार्थ्यांची तपासणी केली असता आणखी दोन विद्यार्थी रॅपिड चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळून आल्याने पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांची संख्या आता सात झाली आहे.


येथील मुख्याध्यापकांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर या शाळेतील विद्यार्थ्यांची करोना तपासणी केली असता शाळेतील पाच विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आले होते. 

सर्व विद्यार्थ्यांची तब्येत चांगली असून काळजी करण्यासारखे नाही असे असले तरी पुढील काही दिवस विद्यार्थ्यांची वैद्यकीय परिस्थिती पाहून व आरोग्य विभागाचे मार्गदर्शन, पालकांशी चर्चा केल्यानंतरच येथील शाळा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल तोपर्यंत उर्वरित विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाईल अशी माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post