शिवरायांचा अवमान करणारी ही भाजपाची छिंदम प्रवृत्ती... चंद्रकांत पाटील यांच्या 'त्या' वक्तव्यावरून वादंग

 

शिवरायांचा अवमान करणारी ही भाजपाची छिंदम प्रवृत्ती... चंद्रकांत पाटील यांच्या 'त्या' वक्तव्यावरून वादंगमुंबई: "छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूत्वाची व्होट बॅंक तयार केली त्यावर कळस चढविण्याचे काम मोदींनी केले" असे तारे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तोडले आहेत. शिवरायांचा अवमान करणारी ही भाजपाची छिंदम प्रवृत्ती आहे.  व्होट बॅंकेच्या हिन राजकारणाशी शिवरायांचा संबंध जोडता?, अशी टीका कॉंग्रेसचे सचिन सावंत यांनी केली आहे.शिवरायांची तुलना मोदींशी आदित्यनाथ व विजय गोयल यांनी केली होतीच. ‘आजके शिवाजी- नरेंद्र मोदी’ पुस्तक भाजपानेच काढले. भाजपा हे जाणिवपूर्वक करत आहे. शिवराय हे सद्विचारांचे प्रतिक आहेत व भाजपा कुविचारांचे, त्यामुळे तुलना पातकच आहे. तात्काळ माफी मागा. जाहीर निषेध. असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले आहे. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post