आदित्य ठाकरेकंडे मुख्यमंत्री पदाचा चार्ज द्यावा, भाजपची मागणी

 

तोपर्यंत आदित्य ठाकरेकंडे मुख्यमंत्री पदाचा चार्ज द्यावा, भाजपची मागणीमुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या  पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष अस लेल्या भाजपमध्ये जोरदार टीका-टिप्पणी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर ते अद्याप समोर आलेले नाहीत.  अशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री बरे होण्यापर्यंत आदित्य ठाकरे यांच्याकडे चार्ज देण्याची मागणी केली आहे.


आरोग्याच्या कारणावरुन राज्यावर अन्याय करु नका. 45 दिवसांपासून राज्यातील जनतेनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाहिलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी लवकर बरं व्हावं. पण तोपर्यंत त्यांनी कुणाकडे तरी चार्ज द्यावा. तीन पक्षांचं सरकार आहे. हवं तर तिघांचं मिळून एक मंडळ तयार करा. आदित्य ठाकरे यांच्याकडे चार्ज द्या, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झालं त्यावेळी त्यांचे अंतिम संस्कार शासकीय इतमामात करण्याची फाईल 5 तास पडून होती. असा व्यक्तींवर ही वेळ येत असेल तर इतरांचं काय. त्यामुळे महाराष्ट्राला रामभरोसे ठेवता येणार नाही, असं पाटील म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post