भाजपला पडले मोठे खिंडार... एकाच वेळी तब्बल २१ नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल

 भाजपला पडले मोठे खिंडार... एकाच वेळी तब्बल २१ नगरसेवक राष्ट्रवादीत दाखलजळगाव :  भुसावळमध्ये भाजपला मोठा झटका बसलाय, कारण भाजपला मोठे खिंडार पडले आहे. भाजपच्या 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश झालाय. अजित पवार यांच्या उपस्थितीत नगरसेवकांनी हाती घड्याळ बांधलंय. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी भाजपला जोरदार धक्का दिलाय. एकानाथ खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर खडसेंनी आधी भाजपला धक्का देत जळगाव महानगरपालिकेत पारडे फिरवले, त्यानंतर भुसावळमध्येही खडसेंनी भाजपला मोठे खिंडार पाडले आहे.


भुसावळमध्ये भाजपला एकनाथ खडसे यांनी खिंडार पाडताना तब्बल 21 नगरसेवकांना राष्ट्रवादीत आणले आहे. राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या सर्व नगरसेवाकांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. त्यामुळे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post