मुख्यमंत्री भेटत नाहीत, महाविकास आघाडीतील ५०-६० आमदारांमध्ये मोठी खदखद

 

मुख्यमंत्री भेटत नाही, महाविकास आघाडीतील ५०-६० आमदारांमध्ये मोठी खदखदशिर्डी: महाविकास आघाडीचे 50 ते 60 आमदार सरकारवर नाराज आहेत. मुख्यमंत्री भेटत नसल्याने आमदारांमध्ये नाराजी वाढली आहे. त्याचा फटका बसू नये म्हणूनच सरकारला विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या नियमात बदल करावे लागले, असा दावा भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे हे आज साई दरबारी आले होते. साई बाबांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला. विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी राज्यसरकारला कायदा आणण्याची गरज का पडली..? गुप्त मतदानाचा कायदा असताना या सरकारला आपल्या आमदारांवर विश्वास का नाही..? जवळपास 50 ते 60 सत्ताधारी आमदार सरकारवर नाराज आहेत. 16 महिने मुख्यमंत्री भेटत नसतील… त्यांची कामे होत नसतील तर काय होणार? असा सवाल बावनकुळे यांनी केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post