मतदान केंद्रात अनधिकृतरित्या प्रवेश, शिवसेना आमदारावर गुन्हा दाखल

 

मतदान केंद्रावर अनधिकृतरित्या प्रवेश, शिवसेना आमदारावर गुन्हा दाखलहिंगोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना मतदान केंद्रावर अनधिकृतरित्या प्रवेश करणे शिवसेना आमदाराला चांगलेच महागात पडले आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या सह त्यांचा अंगरक्षक पोलीस कर्मचारी व इतर तेरा कार्यकर्त्यांविरुद्ध मतदान प्रक्रिया सुरू असताना, मतदान केंद्रात येऊन, मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


औंढा शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील नागनाथ महाविद्यालयात असलेल्या मतदान केंद्रात हा प्रकार घडला असून, रात्री उशिरा मतदान केंद्र अधिकारी दयानंद कल्याणकर यांनी तक्रार दिल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आमदार संतोष बांगर हे त्यांच्या अंगरक्षकासह इतर कार्यकर्त्यांना मतदान केंद्रात घेऊन जातानाचा व्हिडिओ देखील या तक्रारीसोबत जोडण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post