उद्धव ठाकरे बरे व्हायला काही काळ लागेल, तोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा

 

उद्धव ठाकरे बरे व्हायला काही काळ लागेल, तोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करामुंबई:  कारभार अधांतरी चालला असल्याची टीका सध्या भाजपाकडून सातत्याने केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणामुळे ही टीका केली जात असून मुख्यमंत्रिपदाचा भार कोणाकडे तरी सोपवण्यात यावा, अशी मागणी भाजपाकडून सातत्याने केली जात आहे.  आता रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचा पर्याय सुचवला आहे.


मुख्यमंत्री आजारी असल्याने राज्यात अनागोंदी कारभार चालला आहे का? अशावेळी मुख्यमंत्रिपद इतर कोणाकडे सोपवावं? या संदर्भाने प्रश्न विचारला असता रामदास आठवले म्हणाले, मला वाटतं की मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीसांकडे द्यावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत ही गोष्ट खरी आहे. अजून त्यांना ठीकठाक होण्यासाठी २- ३ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post