भ्रष्टाचाराचा कळस...18 रुपयांचा मास्क 370 रुपयांत खरेदी, 400 रुपयांची पीपीई कीट 2000 रुपयांत

 भ्रष्टाचाराचा कळस...18 रुपयांचा मास्क 370 रुपयांत खरेदी, 400 रुपयांची पीपीई कीट 2000 रुपयांत

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली सरकारच्या कारभाराची चिरफाड



मुंबई: विधानसभेत विरोधी पक्षाच्या वतीने मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  कोरोना, कायदा आणि सुव्यवस्था, भ्रष्टाचार अशा विविध समस्या मांडत महाविकास आघाडी सरकारचा भोंगळ कारभार उघड केला. यावेळी फडणवीस यांनी मांडलेले मुद्दे:

➡️ अमरावती येथील दंगल हा एक प्रयोग!


फेक न्युजची फॅक्टरी चालविली गेली.

पाकिस्तानातील फोटो हे त्रिपुरातील भासविण्यात आले.

एक राष्ट्रीय नेता ट्विट करतो आणि कुठलेही नियोजन नसताना 40 हजार लोक रस्त्यावर येतात. हा संयोग असूच शकत नाही.



➡️ दुसऱ्या दिवशी काही प्रतिक्रिया आली,तर पहिल्या दिवशीची घटना डीलिट आणि केवळ दुसऱ्या दिवशीच्या घटनेवर कारवाई.

जाणीवपूर्वक नाव लिहून भाजपा,अभाविप कार्यकर्त्यांवर कारवाई.

रझा अकादमीवर कारवाई करणार आहे की नाही.


➡️ पोलिस दल सुधारले नाही, तर जगातील सर्वोत्तम पोलिस दलाची बदनामी होईल.

माझ्याकडे काही गोपनीय माहिती आली तर जनतेच्या हितासाठी मांडणे हे विरोधी पक्षनेता म्हणून माझे काम आहे. हा अहवाल मी फोडला नाही, तर तो केंद्रीय गृह सचिवांना दिला.

मविआ नेत्यांनीच तो अहवाल फोडला.


➡️ ज्यांनी या प्रकरणाला वाचा फोडली,आज त्यांच्यावरच कारवाई केली जात आहे.

खरोखर हा संपूर्ण घटनाक्रम दुर्दैवी आहे.


➡️ महिला अत्याचाराने तर राज्यात सीमा गाठली आहे. जोवर राज्य सरकार लक्ष घालणार नाही,तोवर स्थिती नियंत्रणात येणार नाही.

मनोधैर्य योजनेचा बोजवारा उडाला आहे.


➡️ भीमराव तापकीर यांच्या जागेवर अवैध कब्जा गुंडांनी केला आणि ते तक्रार करायला गेले तर असे आमदार खूप पाहिले,असे उत्तर दिले गेले.

आमदारांची ही गत असेल तर सामान्य जनतेचे काय हाल.


➡️ राष्ट्रवादीचे नगरसेवक मयुर कलाटेसोबत परीक्षा घोटाळ्यातील मास्टरमाईंड डॉ. प्रीतीश देशमुख हा ५ लाखांचा चेक मुख्यमंत्री सहायता निधीला देतो.कुणाकुणासोबत त्याचे फोटो?

त्याची ट्विटर टाईमलाईन का डीलिट केली गेली.


➡️ ग्रामविकास विभागात १५०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते.

१० वर्ष वा जोवर देशात GST आहे,त्या कालावधीसाठी.

असे कंत्राट देशात कधी पाहिले का?

साऱ्या ग्रामपंचायती नकार देत असताना हे करण्यात आले. अखेर तक्रार झाल्यावर ते रद्द करण्यात आले.


➡️ असे टेंडर काढतात कोण? याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे.

शिवभोजन योजनेत मोठा भ्रष्टाचार.दोन घोट ज्यूस देऊन बालकांचे फोटो काढले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे योजनेत सुद्धा हा प्रकार. फारच दुर्दैवी आहे.


➡️ सरकारकडून स्वस्तात जमीन आणि त्याचा मोबदला सुद्धा!

कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे प्रकरण गंभीर आहे.चार पट मोबदला सरकारच्याच जमीनीवर घ्यायचा,हा तर चांगला गोरखधंदा आहे.


➡️ संभाजीनगरमध्ये सिल्लोडमध्ये एकदम 6 कॉलेजसाठी राज्य सरकारकडून लेटर ऑफ इंटेट एका मंत्र्यांच्या संस्थेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्रतिकूल मत दिलेले असताना सुद्धा.प्रकरण उच्च न्यायालयात गेले.कोर्टाने काय सांगितले, ‘आर्बिटरी एक्सरसाईज ऑफ पॉवर’.


➡️ दिवंगत शिक्षकाची बदली आणि वर्षभरापूर्वी निवृत्ती काय चालले आहे राज्यात.कुणाचा पायपोस नाही.


प्रशासनाचा पूर्ण खेळ मांडला आहे.


➡️ कोरोना कुठे कुठे होतो?


- मंदिरात


- मंत्रिमंडळ बैठकीत


- मंत्रालयात


- अधिवेशनात


- लॉकडाऊन लावताना


- पेट्रोल-डिझेलवरचे कर कमी न करण्यासाठी कोरोना


- शेतकर्‍यांना मदत न करण्यासाठी कोरोना


- कोणत्याही घटकाला मदत नाही, कारण कोरोना


- विकासाच्या प्रत्येक कामात कोरोना.


➡️ कोरोना कुठे जात नाही?


- नेत्यांकडील लग्नात


- सत्ताधारी पक्षांच्या आंदोलनांमध्ये


- काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कुठल्याही बैठकांमध्ये.


➡️ 


- 5 लाखांचे व्हेंटिलेटर 18 लाखांत


- कोविड सेंटर निर्मितीत गाद्या, पंखे, औषधी खरेदीत इतका भ्रष्टाचार की विचारता सोय नाही


- नवीन वस्तु खरेदीच्या किंमतीपेक्षा भाडे अधिक.


➡️ एप्रिल 2020 : 40,671 मृत्यू


एप्रिल 2021 : 84,262 मृत्यू (कोरोना मृत्यू दाखविले : 14,164).


मे 2020 : 52,596 मृत्यू


मे 2021 : 1,22,084 मृत्यू (कोरोना मृत्यू दाखविले : 26,031)


जून 2020 : 68,852 मृत्यू


जून 2021 : 88,812 मृत्यू (कोरोना मृत्यू दाखविले : 27,101).


➡️ 2021 मधील 6 घटना : 75 हून अधिक मृत्यू


9 जानेवारी 2021 : भंडारा (10 बालकांचा मृत्यू)


11 मार्च 2021 : 11 मृत्यू


21 एप्रिल 2021 : नाशिक ऑक्सिजन गळती (24 मृत्यू)


23 एप्रिल 2021 : विरार आयसीयू आग (15 मृत्यू)


28 एप्रिल 2021 : मुंब्रा आगीत (4 मृत्यू)


6 नोव्हेंबर 2021 : नगर 11 मृत्यू.


➡️ पीएम केअर्सला नावं ठेवणार्‍यांनी काय केलं?


पीएम केअर्समध्ये प्राप्त निधी: 3076 कोटी (आर्थिक वर्ष - 2019-20)


पीएम केअर्समधून मंजूर निधी: 3100 कोटी (यातील 1000 कोटी राज्यांना)


सीएम रिलिफ फंड : 799 कोटी रूपये


सीएम फंडातून दिले : 192 कोटी रूपये (24 टक्के).


➡️ मुंबई महापालिकेतील कर्मचारी स्वत:च्या नातेवाईकांच्या नावे कंपन्या काढतात आणि कोट्यावधींची कंत्राटे घेतात. बरबटलेला कारभार आहे. कोविडचे कारण देत ११७ भ्रष्ट अधिकाऱ्यांना मुंबई महापालिकेने कामावर घेतले.


➡️2020-21 या वर्षांत सर्वाधिक निधी कुणाला?


राष्ट्रवादी काँग्रेस : 2,25,461 कोटी रुपये


काँग्रेस : 1,01,766 कोटी रुपये


शिवसेना : 54,343 कोटी रुपये.


➡️महाराष्ट्रात सर्वाधिक बेरोजगारी दर


पीएलएफएस अहवाल :


महाराष्ट्र : 22.6 टक्के


झारखंड : 19.8 टक्के 


केरळ : 18.9 टक्के


जम्मू-काश्मीर : 17.4 टक्के


ओरिसा : 16.5 टक्के


तेलंगणा : 15.4 टक्के


अशा राज्यांसोबत महाराष्ट्राची तुलना यापूर्वी कधीही होत नसे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post