सत्तेत आल्यावर स्वस्तात दारू देऊ, भाजप प्रदेशाध्यक्षांची मोठी घोषणा

 

सत्तेत आल्यावर स्वस्तात दारू देऊ, भाजप प्रदेशाध्यक्षांची मोठी घोषणाअमरावती : आंध्र प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांनी  राज्यातील सगळ्या तळीरामांना खूष करणारी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी राज्यात सत्तेत आल्यानंतर स्वस्तात दारू देण्याचे आश्वासन देऊन राज्यात खळबळ उडवून दिली आहे.

 पक्ष सत्तेत आल्यास दारू 75 रुपयांत उपलब्ध करून दिली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. सरकारचा महसूल वाढल्यानंतर ही किंमत 50 रुपयांवर आणण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे आश्वासन विजयवाडा येथे आयोजित जाहीर सभेत दिले आहे. त्यांच्या या मोठ्या घोषणेची राज्यभरात चर्चा होत आहे.

राज्यात खराब दर्जाची दारू जास्त किमतीने विकली जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. यात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा हात असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. राज्यात 2024 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधीच भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. 

1/Post a Comment/Comments

Post a Comment

Previous Post Next Post