फडणवीस मुख्यमंत्री होणार हे ठरलं होतं... तुम्ही विश्वासघात केला.... केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा शिवसेनेवर घणाघात

 

फडणवीस मुख्यमंत्री होणार हे ठरलं होतं... तुम्ही विश्वासघात केला.... केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा शिवसेनेवर घणाघातपुणे : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज पुण्यातून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ‘दोन पिढ्यांपासून ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्याच मांडीवर जाऊन बसेल’, असा घणाघात शाह यांनी केलाय. ते आज पुण्यातील भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

शिवसेनेवर टीका करताना शाह म्हणाले की, ‘2019 मध्ये महाराष्ट्रात निवडणुका होत्या. त्यावेळी मी स्वत: इथे आलो होतो. मी स्वत: शिवसेनेशी संवाद साधला. तेव्हा फडणवीसांच्या नेतृत्वातच निवडणुका लढायचं ठरलं होतं. मुख्यमंत्रीही भाजपचाच होणार हे सुद्धा ठरलं होतं. पण शिवसेना फिरली. त्यांनी हिंदुत्वाशीही तडजोड केली. दोन पिढ्यांपासून ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्याच मांडीवर जाऊन बसेल आणि म्हणतात आम्ही असं म्हणालोच नाही’, अशी जोरदार टीका शाह यांनी शिवसेनेवर केलीय.


ते म्हणतात मी खोटं बोलत आहे. ठिक आहे. मी खोटं बोलतोय असं मानू. पण तुमच्या सभेच्या पाठी जे बॅनर लागत होते त्यावर तुमच्या फोटोची आणि मोदींच्या फोटोची साईज पाहा. तुमची केवळ एक चतुर्थांश होती. प्रत्येक भाषणात तुम्हाला मोदींचं नाव घ्यावं लागत होतं. तुमच्या उपस्थित मी आणि मोदींनी सांगितलं होतं फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या आहेत आणि एनडीए निवडणूक जिंकल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होतील. पण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं. तुम्ही आमच्यासोबत विश्वासघात केला सत्तेत बसले’, असा घणाघातही शाह यांनी केलाय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post