केंद्रीय मंत्री अमित शहांचा नगर दौरा निश्चित, राज्यस्तरीय सहकार परिषद व शेतकरी मेळावा

 

केंद्रीय मंत्री अमित शहांचा नगर दौरा निश्चित, राज्यस्तरीय सहकार परिषद व शेतकरी मेळावानगर : सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवल्या गेलेल्या सहकाराच्या पंढरीत देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सहकार चळवळीला नवी दिशा देणार्‍या या सहकार परिषदेच्या यशस्वीतेसाठी चळवळीतील कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत प्रवरानगर येथे शनिवार दि. 18 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वा. राज्यस्तरीय सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार्‍या या परिषदेस केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सहकारी साखर कारखाना, सहकारी बँक, सहकारी पतसंस्था क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे आ. विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले.

सहकार परिषदेच्या निमित्ताने प्रवरानगर येथील कामगार सांस्कृतिक भवनात तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, खा. डॉ. सुजय विखे पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, सभापती नंदाताई तांबे, डॉ. विखे पाटील कारखान्याचे व्हा. चेअरमन विश्वासराव कडू, गणेश कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रतापराव जगताप, अ‍ॅड. रघुनाथ बोठे, नंदू राठी, अशोकराव म्हसे, ओबीसी आघाडीचे बाळासाहेब गाडेकर, जि.प. सदस्या रोहिणी निघुते, दिनेश बर्डे, भाजयुमोचे सचिन तांबे, सतीश बावके, अभय शेळके, कैलास तांबे, नंदकुमार जेजूरकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post