बुरुडगाव सीना नदी पुलाच्या कामासाठी 5.50 कोटी रुपये निधी मंजूर- आ.संग्राम जगताप

 आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून बुरुडगाव सीना नदी पुलाच्या कामासाठी 5.50 कोटी रुपये निधी मंजूर

लवकरच होणार कामाला सुरुवात आमदार संग्राम जगताप यांनी केली पुलाची पाहणी

नगर शहर विस्तारीकरणाच्या विकास कामासाठी प्रयत्न केले - आ.संग्राम जगतापअहमदनगर प्रतिनिधी  - शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम सुरू आहे. विकासाला चालना दिल्यामुळे नागरी वसाहती दिवसें दिवस वाढत आहे.दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी नवीन डीपी रस्ते व सीना नदी वरील पुलाच्या कामासाठी राज्य शासनाकडे निधीसाठी प्रयत्न केल्यामुळे टप्प्याटप्प्याने विकास कामासाठी निधी प्राप्त होत आहे.नाबार्ड २६ अंतर्गत बुरुडगाव सीना नदी वरील पुलासाठी ५.५० कोटी निधी मंजूर झाला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.याच बरोबर वाकोडी भिंगार नाला व बाबर मळा येथील पुलाच्या  कामासाठी निधी प्राप्त होणार आहे, नागरिकांना विश्वासात घेऊन शहर विकासाला चालना दिली जात आहे. शहराचे कायम स्वरूपाचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी माझे काम सुरू असून शहर विकासाची कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लागत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


        आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून बुरुडगाव सीना नदी वरील नाबार्ड २६ अंतर्गत मंजूर ५.५० कोटी रुपयांचा पुलाच्या कामाची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली यावेळी समवेत मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर,नगरसेवक कुमारसिंह वाकळे नाशिक डिझाईन विभागाचे उपअभियंत ए.एच.मराठे,उपअभियंता ए. जी. पेटेल,उपअभियंता ए. एस.शेळके,नगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अंकुश पालवे, शाखा अभियंता सचिन चव्हाण,मा.सरपंच बापूसाहेब कुलट,मा.उपसरपंच खंडू काळे, राधाकिसन कुलट तसेच ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post