सहायक शिक्षकाला नियमित करण्यासाठी 50 हजार घेताना मुख्याध्यापिका एसीबीच्या जाळ्यात

 सहायक शिक्षकाला नियमित करण्यासाठी मागितले साडेसहा लाख, 50 हजारांची लाच घेताना मुख्याध्यापिकेस अटक


नागपूर : सहायक शिक्षकाला नियमित करण्यासाठी साडेसहा लाख रुपये मागण्यात आले. अतिरिक्त होण्याची भीती या शिक्षकाला दाखविण्यात येत होती. परंतु, लाच देण्याची इच्छा नसल्यानं संबंधित शिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं गेला. एसीबीनं सापडा रचून संचालक भामराज मेश्राम व मुख्याध्यापिका शांतशीला मेश्राम यांना अटक केली. खापरखेडा येथे मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.पारशिवनी तालुक्यातील करभांड येथे तथागत विद्यालय आहे. या विद्यालयात तक्रारदार शिक्षक कार्यरत आहेत. ही संस्था संचालित करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष भामराज दौलतराव मेश्राम आहेत. तर त्यांची पत्नी शांतशीला मेश्राम या विद्यालयात मुख्याध्यापिका आहेत. संबंधित शिक्षकाला मुख्याध्यापिका शाळेतील हजेरी पटावर स्वाक्षरी करू देत नव्हती. जानेवारी महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. ही शाळा 40 टक्के शासकीय अनुदानावर आली आहे. परंतु, गैरहजेरी लागल्यानं संबंधित शिक्षक हा अतिरिक्त व अनियमित ठरणार होता. तो शाळेत नियमित ठरावा, यासाठी तक्रारदाराला सहा लाख 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. परंतु, 20 हजार रुपये महिन्याच्या वेतनात 50 हजार रुपयांचा हप्ता भरण संबंधित शिक्षकाला शक्य नव्हतं.

त्यामुळं संबंधित शिक्षकानं संचालक व मुख्याध्यापिकेची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं सोमवारी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post