जि.प., पंचायत समितीत विनामास्क असल्यास 500 रुपयांचा दंड

जि.प., पंचायत समितीत विनामास्क असल्यास 500 रुपयांचा दंड नगर- ओमिक्रॉनने नगर जिल्ह्यात प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या कार्यालयात योग्य मास्कची सक्ती करण्यात आली आहे. विना मास्क येणाऱ्यांवर ५०० रुपये दंडाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या मुख्यालय आणि तालुका पातळीवर असणाऱ्या पंचायत समितीच्या कार्यालयात विविध कामे आणि प्रश्न घेऊन येणाऱ्यांची संख्या मोठी असते. यातील अनेकांच्या तोंडावर मास्क नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. क्षीरसागर यांच्या निदर्शनास आले.  यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यालयासह जिल्हा परिषद मुख्यालय आणि पंचायत समितीच्या कार्यालयात विना मास्क असणाऱ्यांना बंदी केली असून आले तर त्यांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यालयात आतापर्यंत १० कर्मचाऱ्यांना विना मास्कमुळे दंड करण्यात आला असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post