आरोग्य विभाग पेपर लीक प्रकरण....आरोग्य विभागातील मोठ्या अधिकार्‍यासह 5 अटकेत

आरोग्य विभाग पेपर लीक प्रकरण....आरोग्य विभागातील मोठ्या अधिकार्‍यासह 5 अटकेत

आरोग्य विभाग पेपर लीक प्रकरण....आरोग्य विभागातील मोठ्या अधिकार्‍यासह 5 अटकेत


 बीड : आरोग्य विभाग  पेपरफुटी प्रकरणात बडे मासेगळाला लागल्याने मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. पुणे  पोलिसांच्या सायबर ब्रँचने लातूर येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यासह ५ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यामधील ५ आरोपी आहेत. या प्रकरणामधील अटक केलेल्या आरोपींची संख्या आता ११ वर पोचली आहे.

विशेष म्हणजे अटक केलेल्या आरोपींमध्ये डॉक्‍टर, शिक्षक, निवृत्त लष्करी जवानांचा समावेश आहे. काल ४ जणांना अटक  करण्यात आली आहे. यात लातुर सार्वजनिक आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे (वय-५०), रा. योगेश्वरी नगरी, अंबेजोगाई, बीड, डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड (वय- ३६), रा. एकात्मता कॉलनी, अंबेजोगाई, बीड, उद्धव प्रल्हाद नागरगोजे (वय- ३६), रा. तिंतरवणी, ता. शिरूर कासार, जि. बीड, शाम महादू म्हस्के (वय- ३८), रा. पंचशीलनगर, अंबेजोगाई, जि. बीड, राजेंद्र पांडुरंग सानप (वय-५१), रा. शामनगर, बीड अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post