मुंबई कसोटीत भारताचा 372 धावानी शानदार विजय

मुंबई कसोटीत भारताचा 372 धावानी शानदार विजय

  


मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाने 372 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. पहिल्या डावात भारतीय संघाने 325 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या न्यूजीलंच्या संघाला भारताने अवघ्या 62 धावांत रोखलं. त्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या डावात भारताच्या फलंदाजांनी 7 बाद 276 धावांवर डाव घोषित केली. आणि न्यूझीलंडला 540 धावांचं आव्हान दिलं. मात्र हे आव्हान न्यूझीलंडच्या संघाला पेलवलं नाही. न्यूझीलंडच्या संघ दुसऱ्या डावात 167 धावांमध्ये ऑल आऊट झाला. त्यामुळे भारताने मुंबई कसोटी 372 धावांनी शानदार विजय मिळवला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज तिसऱ्या दिवशी भारताने सामना पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवला होता. 540 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने काल दिवसअखेर 5 बाद 140 धावांपर्यंत मजल मारली होती. विजयासाठी न्यूझीलंडला दोन दिवसात 400 धावांची आवश्यकता होती. तर भारताला पाच विकेट्सची गरज होती. मात्र अवघ्या 27 धावांनी त्यांनी उर्वरित 5 फलंदाज गमावले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post