महापौर बनविण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला 35 लाख रुपये दिले, आमदाराचा धक्कादायक गौप्यस्फोट

महापौर बनविण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला 35 लाख रुपये दिले, आमदाराचा धक्कादायक गौप्यस्फोट कोल्हापूर : महापालिकेत आपल्या पक्षाचा महापौर करण्यासाठी एका-एका नगरसेवकाला 35- 35 लाख रुपये दिले असल्याची कबुली जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांनी पत्रकारांसमोर दिली मात्र ही आपल्या हातून घडलेली मोठी चूक असल्याचही त्यांनी सांगितलं. 

15 वर्षापूर्वी आमदार विनय कोरे आणि मंत्री हसन मुश्रीफ  यांनी कोल्हापूर महापालिकेतील   माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाला आव्हान दिलं होतं नगरसेवकांना आपल्याकडे खेचून महाडिकांची महापालिकेतील सत्ता संपुष्टात आणली होती. मात्र सत्ता आणण्यासाठी त्यांनी वापर केलेल्या धनशक्तीची जाहीर कबुली कोरे यांनी पहिल्यांदाच दिली आहे. वडगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा काल करण्यात आली याप्रसंगी आमदार कोरे यांनी ही कबुली दिली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post