हॉटेलमधील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा, माजी आमदारासह 29 जणांवर कारवाई

हॉटेलमधील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा, माजी आमदारासह 29 जणांवर कारवाई सोलापूर : होटगी रोड मुलतानी बेकरी जवळील क्लब नाईन या रेस्टोबार मध्ये चालणा-या अवैध जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेकडून छापा टाकण्यात आला. यात जुगार क्लब चालविणारे माजी आमदार रविकांत पाटील  यांच्यासह एकूण २९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त हरीश बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने ही मोठी कामगिरी बजावली.

गुन्हे शाखेतर्फे  या हॉटेलवर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी अवैधरित्या जुगार सुरू असल्याचे आढळून आले. लोकांना जुगार अड्डा स्वतः माजी आमदार रविकांत पाटील चालवत असल्याचा आरोप पोलिसांचा आहे. छापा टाकल्याच्या वेळी माजी आमदार रविकांत पाटील हे स्वतः हॉटेलच्या बाहेर कार्यकर्त्यासह बसलेले होते. हॉटेलमध्ये पोलिस गेल्यानंतर जवळपास 19 जण हे जुगार खेळताना आढळले. त्यांच्याकडून रोख 2 लाख 24 हजार 540 रुपये, 4 लाख 19 हजारांचे मोबाईल, 13 हजारांचे जुगार साहित्य असे एकूण 6 लाख 57 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्व 29 आरोपींना रात्री उशिरापर्यंत विजापूर नाका पोलिस ठाण्यात बसविण्यात आले होते. रात्री उशीरा सर्व आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यात आली. माजी आमदार रविकांत पाटील यांना अटक झाल्याचे कळताच कर्नाटकातील त्यांच्या समर्थकांनी विजापूर नाका पोलिस ठण्यासमोर मोठी गर्दी केली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post