भारताची हरनाझ संधू नवीन ‘मिस युनिवर्स 2021' video...

भारताची हरनाझ संधू नवीन ‘मिस युनिवर्स 2021'  ‘मिस युनिवर्स 2021’चा खिताब भारताच्या हरनाझ संधूनं जिंकलाय. २१ वर्षीय हरनाझला १२ डिसेंबर रोजी इस्रायलच्या इलात येथील युनिव्हर्स डोममध्ये मिस युनिव्हर्सचा मुकुट देण्यात आला. तब्बल २१ वर्षांनंतर भारताला मिस युनिव्हर्सचा खिताब मिळाला आहे. तिच्या आधी २१ वर्षांपूर्वी लारा दत्ताने २००० साली मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला होता. 

हरनाझच्या विजयाची बातमी मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनच्या अधिकृत इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली. इस्रायलमध्ये आयोजित कार्यक्रमात हरनाझला मुकुट घातला गेला तो क्षण त्यांनी शेअर केला आहे. “नवीन मिस युनिव्हर्स आहे…इंडिया,” असं कॅप्शन त्या व्हिडीओला देण्यात आलंय. क्लिपमध्ये मेक्सिकोची मिस युनिव्हर्स २०२० आंद्रिया मेझा भावनिक झालेल्या हरनाझला मुकुट घालताना दाखवली आहे.

video0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post