प्राप्तीकर विभागानं टाकलेल्या छाप्यात सापडलं मोठ्ठं घबाड, 175 कोटी रोख रक्कम जप्त

प्राप्तीकर विभागानं टाकलेल्या छाप्यात सापडलं मोठ्ठं घबाड, 175 कोटी रोख रक्कम जप्त


 

कानपूरः उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर आणि कनौजमधील शिखर पानमसाला व्यापारी पीयूष जैन यांच्या घरी प्राप्तीकर विभागानं टाकलेल्या छाप्यात अफाट मोठ्ठं घबाड सापडलं. आयकर विभागाच्या मदतीने डीजीआय (जीएसटी इंटेलिजन्स महासंचलनालय) च्या टीमने या व्यापाऱ्याच्या घगरावर काल छापा  टाकला. इथे शंभर, दीडशे नव्हे तर तब्बल पावणे दोनशे कोटी कोटी रुपयांचा साठा सापडला. व्यापाऱ्याच्या घरातील कपाटांमध्ये रद्दी, कचरा भरावा त्याप्रमाणे खचाखच नोटा भरलेल्या आढळून आल्या. या नोटांची गणती अजूनही सुरूच आहे. शुक्रवारी या व्यापाऱ्याच्या घराची झडती घेण्यात आली. पियूष जैन यांचे पुत्र प्रत्यूष आणि प्रियांश जैन यांना अटक करण्यात आली असून अधिकारी पुढील तपास करत आहे. 


  पियूष जैन हे शिखर पानमसाला आणि परफ्यूमचे व्यापारी असून ते समाजवादी पार्टीचे नेते आहेत. उत्तर प्रदेशाच्या इतिहासात, जीएसटीच्या छाप्यात प्रथमच एवढं मोठं घबाड सापडल्याचा दावा प्राप्तिकर विभागनं केला आहे. अधिकारी म्हणाले की, या जागेवर छापा मारल्यानंतर पियूष जैन यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे उघड झाले. सध्या पियूष जैन गायब आहेत. या छाप्यात 175 कोटी रोख रक्कम जप्त करण्यात आली. पियूष जैन यांच्या घरावरील जीएसटी इंटेलिजन्सची ही कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. पियूष जैन यांच्या मागावरील पथकाच्या काही टीम कापपूर, कनौज आणि मुंबईतही छापेमारी करत आहेत. दरम्यान त्यांचे दोन पुत्र प्रत्यूष आणि प्रियांश जैन यांना कानपूरमधील आनंदपुरी येथील जैन निवास येथून अटक करण्यात आली. आयकर विभागाने या दोघांनाही कनौज येथील कारखान्यात नेले आणि तेथे रोख रक्कम आणि दस्तावेज तपासले गेले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post