देशात 11 दिवस हसायचं नाही.... घरात कोणी मयत झाल्यास अंत्यसंस्कारही करायचे नाहीत....

 

11 दिवस हसायचं नाही.... घरात कोणी मयत झाल्यास अंत्यसंस्कारही करायचे नाहीत....उत्तर कोरिया : उत्तर कोरियाचे माजी नेता किम जोंग इल यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त उत्तर कोरिया 11 राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. उत्तर कोरियाचे विद्यमान नेता किम जोंग उन यांनी हा शोक जाहीर केला आहे. या 11 दिवसात उत्तर कोरियातील नागरिकांना हसणे, शॉपिंग करणे, दारु पिणे, वाढदिवस साजरा करणे यावर बंदी घालण्यात आली आहे.विशेष म्हणजे या 11 दिवसाच्या कालावधीत कुणाचा मृत्यू झाला तर त्याच्या नातेवाईकाला मोठ्याने रडण्याचीही परवानगी नाही. तसेच नातेवाईक मृतदेहावर अंत्यसंस्कारही 11 दिवसाचा शोक पूर्ण झाल्यानंतर करु शकतात, अशी माहिती एका नागरिकाने दिली. पोलिस अधिकाऱ्यांना लोकांवर सतत लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post