लस प्रमाणपत्रावर मोदींचाच फोटो....कोर्टाने आक्षेप घेणार्‍या याचिकाकर्त्याला 1 लाखांचा दंड ठोठावला!


लस प्रमाणपत्रावर मोदींचाच फोटो....कोर्टाने आक्षेप घेणार्‍या याचिकाकर्त्याला 1 लाखांचा दंड ठोठावला!



 गेल्या वर्षभरापासून देशभरात व्यापक प्रमाणावर लसीकरणाची मोहीम सुरू आहे.  देशात एक डोस घेतलेल्या व्यक्तींची संख्या १०० कोटींहून जास्त झाली आहे. दुसरा डोस देखील लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, लसीकरण झाल्यानंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्रावरून गेल्या काही दिवसांमध्ये बरीच चर्चा झाली आहे. या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं छायाचित्र आणि त्यासोबत त्यांचा संदेश यावर काहींनी तीव्र आक्षेप घेतला आहे. विरोधकांनीही हा मुद्दा वेळोवेळी उचलला आहे. मात्र, आता केरळ उच्च न्यायालयाने असा आक्षेप घेणारी याचिका फेटाळत याचिकाकर्त्यालाच सुनावलं आहे. तसेच, यासाठी १ लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे.


केरळ उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. यावर आज न्यायालयानं आपला निर्णय दिला आहे. ही याचिका म्हणजे न्यायालयाचा वेळ वाया दवडण्याचा प्रकार असून ती राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं मत न्यायालयानं यावेळी नोंदवलं. तसेच, अशा प्रकारच्या याचिका करण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी १ लाखांचा दंड ठोठावण्यात आल्याचं देखील न्यायालयानं आपल्या आदेशांमध्ये नमूद केलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post