भाग्यवान जोडप्यास IVF उपचार मोफत, ‘या’ हॉस्पिटलमध्ये दिवाळी स्पेशल योजनेचा शुभारंभ

 डॉ झेंडे हॉस्पिटलमध्ये दिवाळी स्पेशल योजनेचा शुभारंभनगर -  शहरातील तारकपूर या ठिकाणी असणारे व गेल्या 25 वर्षा पासून कार्यरत असणारे  डॉ झेंडे हॉस्पिटलमध्ये दिवाळी स्पेशल योजनेचा शुभारंभ कार्यक्रम नुकताच पार पडला कार्यक्रमाचे उदघाटन हे सांस्कृतिक व नाट्य क्षेत्रातील सुप्रसिद्ध व अनुभवी व्यक्तिमत्व डॉ विजयकुमार जोशी याच्या शुभहस्ते झाले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे डॉ प्रशांत झेंडे आणि प्रमुख पाहुणे ह्या डॉ मंजिरी झेंडे या होत्या समवेत झेंडे हॉस्पिटल चा संपूर्ण स्टाफ ही उपस्थित होता.

     कार्यक्रमात मागील वर्षी अशाच प्रकारे राबविण्यात आलेल्या योजनेत पहिली भाग्यवान ठरलेली आय.व्ही.एफ.पेशंट यावेळी उपस्थित होते.

    यावेळी या योजनेची सविस्तर माहिती  सांगतांना डॉ मंजिरी झेंडे म्हणाले की , कोरोना सारख्या संकटामुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक परिस्थिती चे भान ठेवून एक सामाजिक बांधिलकी म्हणून सदर योजना ही गरजू अपत्यहीन जोडप्यांना वरदान ठरणारी असून ही योजना 15 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत डॉ झेंडे हॉस्पिटलमध्ये मागील वर्षी प्रमाणे राबिवली आहे, या योजने मध्ये IVF चा उपचार हा औषधांच्या खर्चा सहित भरपुर अश्या सवलतीच्या दरात  होणार असून दर 12 जोडप्यांच्या मधून 1 भाग्यवान जोडप्यास IVF उपचार मोफत केला जाऊन फक्त औषधी चा खर्च हा द्यावा लागणार आहे. 

तरी जास्तीत जास्त गरजू दाम्पत्याने या योजनेचा लाभ घ्यावा व 0241 2430326, 2993636, 9890855137 या नंबर वरती अधिक माहिती साठी संपर्क करावा असे आवाहन हॉस्पिटल तर्फे करण्यात आले आहे 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post