पारनेर तालुक्यात प्रसिद्धीचा उजेड, प्रत्यक्षात वीजेअभावी अंधार.... सुजित झावरे यांचा आ.लंकेंसह सरकारवर निशाणा

 पारनेर तालुक्यात प्रसिद्धीचा उजेड, प्रत्यक्षात वीजेअभावी अंधार.... सुजित झावरे यांचा आ.लंकेंसह सरकारवर निशाणानगर: पारनेर तालुक्यात सध्या सक्तीने वीज तोडणी करून वीज वसुली केली जात आहे. दिवाळीपासून तालुक्यातील अनेक गावे अंधारात असून शेतकर्‍यांची वीज तोडणी महावितरण कडून सुरूच आहे. हे अतिशय अन्यायकारक आहे. तालुका हा प्रसिद्धीच्या बाबतीत पूर्ण राज्यात चमकतोय पण शेतकर्‍यांची वीज तोडणी मुळे तालुका हा दिवाळीपासून अंधारात असल्याचे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे पाटील यांनी व्यक्त केले. 


दरम्यान वीज तोडणी मुळे तालुक्यातील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकर्‍याला कोंडीत पकडून जी वीज वसुली सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांकडून सक्तीची वीज वसुली करून महावितरण प्रशासन हे शेतकर्‍यांवर अन्याय करत असल्याची भावना सुजित झावरे पाटील यांनी व्यक्त केली असून तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत न केल्यास आक्रमक भूमिका घेत पारनेर महावितरण कार्यालयावर आक्रमक आंदोलन  करण्याचा इशारा दिला. तालुका अंधारात असेल तर कोणाच्या आशीर्वादाने व दबावाखाली तालुक्यातून पुणे जिल्ह्यामध्ये वीज दिली जाते हे तपासणे गरजेचे आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post