भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीला WHO ची मान्यता

 भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन  लशीला WHO ची मान्यताहैदराबादच्या भारत बायोटेक या लसनिर्मिती करणाऱ्या कंपनीची निर्मिती असलेल्या कोवॅक्सिन लसीला आता जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळाली आहे. कोवॅक्सिन ही भारताने बनवलेली स्वतःची कोरोना प्रतिबंधक लस आहे. जवळपास वर्षभरापूर्वीच भारत सरकारच्या औषध महानियंत्रकांनी या लसीच्या भारतातील वापराला परवानगी दिली होती. ही लस भारत बायोटेक सोबत आयसीएमआर आणि राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्थेने एकत्रित रित्या बनवली आहे. दोन दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाने कोवॅक्सिन लसीला परवानगी दिली होती, त्याबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलिया सरकारचे आभार व्यक्त केले होते. 

भारत बायोटेकचं संशोधन आणि निर्मिती असलेल्या या लसीला जागतिक आरोग्य संघटेनची परवानगी मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासात येत असलेल्या अडचणी दूर होण्यास मदत होईल. भारतातून अन्य देशांमध्ये जाणाऱ्यांनी कोवॅक्सिन लस घेतलेली असेल तर त्यांना संबंधित देशात गेल्यानंतर कॉरंटाईन नियमाचे पालन करावे लागत असे. डब्लूएचओची मान्यता मिळाल्यामुळे आता हा द्रविडी प्राणायम वाचणार आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post