मोबाईलवर बोलणं, डाटा महाग!...व्होडाफोन आयडियाचीही प्रीपेड प्लॅन्सची दरवाढ

मोबाईलवर बोलणं, डाटा महाग!...व्होडाफोन आयडियाचीही प्रीपेड प्लॅन्सची दरवाढ मुंबई :    एअरटेल पाठोपाठ व्होडाफोन आयडियाने देखील आपल्या प्रिपेड प्लॅनच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांना देखील आर्थिक झळ बसणार असून, नवे दर येत्या 25 नोव्हेंबरपासून लागू केले जाणार आहेत. वर्तमान काळात व्होडाफोन आयडियाचा सर्वात स्वस्त प्रिपेड प्लॅन हा 75 रुपयांचा आहे, त्यामध्ये वाढ होऊन तो 99 रुपये इतका होणार आहे.  

व्होडाफोन आयडियाच्या सुधारित दरानुसार 149 रुपयांच्या प्रिपेड प्लॅनची किंमत 179 रुपये होणार आहे. ज्यामध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग 300 एसएमएस आणि महिन्याला 2GB डेटा मिळणार आहे. तर 219 रुपयांच्या प्लॅनची किंमत वाढवून 269 रुपये एवढी करण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल दिवसाला 100  एसएमएस आणि दर दिवशी 1 जीबी इंटरनेट मिळेल. 299 रुपयांच्या प्लॅनसाठी ग्राहकांना 359 रुपये मोजावे लागणार आहेत. यामध्ये 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल दिवसाला 100  एसएमएस आणि दर दिवशी 2 जीबी इंटरनेट मिळेल. अशा प्रकारे आयडिया व्हॉडाफोन आपल्या सर्वच प्रिपेड प्लॅनमध्ये जवळपास 20 ते 25 टक्के वाढ करणार आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post