भाजप-शिवसेनेची युती कायम राहणार...खा.विखेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

भाजप-शिवसेनेची युती कायम राहणार...खा.विखेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण


 

नगरः  भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी  पारनेरमध्ये बोलताना तालुक्यात भाजप-शिवसेनेची युती कायम राहणार असल्याचे वक्तव्य करून जिल्ह्याच्या राजकारणात धमका केला होता. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या वयोश्री योजनेचा कार्यक्रम पारनेर तालुक्यात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी डॉ. विखे यांनी शिवसेनेसंबंधी हे वक्तव्य केले होते. शिवसेनेच्या तालुकाध्यक्षांसह काही पदाधिकारी यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना डॉ. विखे यांनी मागील लोकसभा निवडणुकीची आठवण सांगितली. त्यावेळी शिवसेना व भाजपची युती होती. आपल्या विजयात पारनेरमधील शिवसेनेचा मोठा वाटा असल्याचे सांगून राज्यात काहीही निर्णय झाला, तर येथे भाजप आणि शिवसेना यापुढेही एकत्रित राहतील, असेही विखे म्हणाले.

 पारनेरचे शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी आणि सध्याचे आमदार लंके यांच्यात टोकाचे राजकीय वैर आहे.  औटी यांना मानणारे कार्यकर्ते स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहेत. अशा परिस्थितीत डॉ. विखे यांच्या वक्तव्याची मोठी चर्चा सुरू झाली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post