सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आग....आ.राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली "ही" मागणी

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आग....आ.राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली "ही" मागणी

 अहमदनगर-येथील शासकीय रुग्णालयातील आयसीयु विभागाला लागलेल्या आगीची  घटना अंत्यत दुर्दैवी असून,निरापराध नागरीकांचा  बळी जाण्यास  रूग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याने, घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे   आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असले तरी चौकशीचा  केवळ फार्स न करता यातील सत्यता समोर आणण्याची  अपेक्षा भाजपा नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील व्यक्त केली.

यापुर्वी राज्यात नासिक, भंडारा आणि मुंब्रा येथील रुग्णालयात झालेल्या घटनांचा अनुभव राज्य सरकारसमोर होता. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत असेच निरापराध नागरीकांचे प्राण गेले.पण सरकार यातून शहाणपण शिकले नाही.या घटनांच्या चौकशीच्या अहवालाचे काय झाले असा प्रश्न करून, नगरच्या रूग्णालयात झालेल्या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असतील तर तो केवळ फार्स ठरु नये.घटनेस जबाबदार असणाऱ्या व्यक्तिंवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

शासकीय रूग्णालयातील अतिदक्षता विभागाची उभारणी दिडवर्षापुर्वी करण्यात आली.परंतू तिथल्या वातानुकुलित व्यवस्थेची पूर्तता झालेली होती काॽ असा प्रश्न समोर आला आहे.फायर आॅडीट  झाले होते की नव्हते याबाबत प्रशासकीय स्तरावर गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळेच इथल्या व्यवस्था तसेच आवश्यक उपाय योजनांबाबत मंत्रीच अनभिज्ञ होते. त्यामुळेच उपचारांसाठी दाखल झालेल्या दहा निरापराध जेष्ठ नागरीकांच्या मृत्यूस  प्रशासनाचा हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला.

या दुर्दैवी घटनेचे कोणतेही राजकारण आम्हाला करायचे नाही परंतू मागील दोन वर्षापासून कोव्हीड परीस्थीती हाताळण्यात पालकमंत्र्यांसह जिल्ह्य़ातील तीनही मंत्र्यांना आलेल्या  अपयशामुळे जिल्ह्यात  निरापराध नागरीकांचे बळी गेले.योग्य उपाय योजना वेळेत न झाल्याने प्रशासनाची हतबलता समोर आली. मृतांच्या आकडेवारीतही नगर जिल्हा वरच्या स्थानावर दिसला.जिल्ह्याला वार्यावर सोडून दिल्याकडे लक्ष वेधून आ.विखे पाटील यांनी या दुर्दैवी घटनेची  चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असला तरी तो केवळ फार्स न ठरता  या घटनेतील सत्यता समोर आणून  दोषी व्यक्ति विरोधात कारवाई करण्याची मागणी आ.विखे पाटील यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post