विधानपरिषद निवडणुक...विद्यमान आमदार अरूणकाका जगताप यांची भूमिकाच ठरणार निर्णायक !

 


विधानपरिषद निवडणुक...विद्यमान आमदार अरूणकाका जगताप यांची भूमिकाच ठरणार निर्णायक !नगर : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता दिवाळीनंतर लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या जागेवर गेल्या दोन टर्मपासून आ.अरूणकाका जगताप हे प्रतिनिधीत्त्व करीत आहेत. दोन्ही वेळा त्यांनी लक्षणीय विजय मिळवत या मतदारसंघावरील आपले वर्चस्व सिध्द केले होते. आता या मतदारसंघात निवडणुकीसाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. परंतु, स्वत: आ.जगताप यांनी सध्या तरी आपल्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम ठेवत सूचक मौन बाळगले आहे. 

आ.जगताप हे स्वत:च रिंगणात उतरल्यास अनेक इच्छुकांचा हिरमोड होवू शकतो. मोजकेच मतदार असलेल्या या निवडणुकीत गणित जुळवण्याची आ.अरूणकाका जगताप यांची हातोटी संपूर्ण जिल्ह्याला परिचित आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने सलग दोन वेळा त्यांना उमेदवारी दिली. आताही उमेदवार बदलल्यास तो तितक्याच ताकदीचा असणे महत्त्वाचे असल्याने राष्ट्रवादीकडून तिसर्‍यांदाही उमेदवारीची माळ आ.जगताप यांच्याच गळ्यात पडू शकते. त्यामुळे सध्या आ.अरूणकाका जगताप यांचे समर्थकही मौन बाळगून असून पक्षाच्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत. निवडणुकीत स्वत: जगताप उमेदवार असले किंवा नसले तरी नगर महानगरपालिकेसह इतरत्र त्यांचा असलेला प्रभाव लक्षणीय असल्याने तेच या निवडणुकीत किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post